Palghar Election 2024 : बविआ उमेदवार राजेश पाटील पालघर तालुक्यात वेगवान प्रचार
पालघर (Palghar Election 2024) : बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
आज पालघर तालुक्यात त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत प्रचाराचा धडाका लावला. पालघर पूर्व हायवे विभागातील ढेकाळे, सातीवली, कुडे,बोट, हालोली, दुर्वेश, सावरे,एंबुर ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेताना दिसत होते.
राजेश पाटील यांच्यासोबत माजी मंत्री तथा समाज कल्याण सभापती मनीषा ताई निमकर, तालुका अध्यक्ष तथा संचालक टीडीसी बँक श्री नागेश पाटील,बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ घरत,माजी सभापती विष्णू कडव,माजी जिल्हापरिषद सदस्य जीवन सांबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनू भाऊ नाईक,माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण सातवी ,युवा तालुका अध्यक्ष कामनिष राऊत,आणि बहुजन विकास आघाडीचे विभगातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य,पदाधिकारी ,युवा कार्यकर्ते प्रचारात आघाडीवर होते. या भागात राजेश पाटील राजकीय व सामाजिक कार्यात सतत सक्रिय असल्याने त्यांना गाव खेड्यातील जनतेत वेगळी ओळख देण्याची आवश्यकता दिसून येत नाही. नागरिक त्यांच्या आगमनाचे उत्स्फूर्तपणे व उत्साहाने स्वागत करताना दिसत आहेत.