ठाणेमराठी न्यूज़मुंबईराजनीतिवसई-विरारविधानसभा चुनाव 2024

Amit Shah Vasai : यु.सी.सी , सी.ए.ए देशाला आवश्यक- अमित शाह

कमळाला मत म्हणजेच देशाला चोहोबाजूंनी स्थेर्य, अमित शहांच्या वसईच्या सभेला जमला तुफान जनसागर

वसई : इंडी अलायन्स म्हणजे एकप्रकारे सर्कशीचे गठबंधन असून त्यातील घटक पक्षांचे धेय्य हे केवळ परिवार वादाचेच आहे .कारण उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे .शरद पवार यांना त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री करायचे आहे .ममता बॅनर्जी यांना त्यांच्या भतीजाला मुख्यमंत्री करायचे आहे .लालू यादव यांना सुद्दा आपल्याच मुलाला मुख्यमंत्री करायचे असून ज्याची लॉंचिंग होतच नाही त्या राहुल बाबाला सोनियांना प्रधानमंत्री करायचे आहे .

Amit Shah Vasai

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईत पालघर लोकसभा उमेदवार डॉ हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी वसईत आले होते त्यावेळी ते बोलत होते. त्यांची नियोजित सभा ही सकाळी होती मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ही सभा संध्याकाळी तीन वाजता झाली . तरीही येथे मोठ्या प्रमाणात जन समुदायाने हजेरी लावली होती .यामध्ये महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती . तर मंचावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,पालक मंत्री रविंद्र चव्हाण, रविंद्र फाटक, श्रमजीवीं संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, महेंद्र पाटील, राजन नाईक,रानी द्विवेदी, खासदार राजेंद्र गावित, उमेदवार हेमंत सावरा,नंदकुमार पाटील, मनोज पाटील, नवीन दुबे, ईश्वर धुले, निलेश तेंडुलकर, स्नेहा दुबे, राजाराम मुळीक आदी मान्यवरांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Amit Shah Vasai

यावेळी अमित शहांनी विरोधकांचा भरपूर समाचार घेतला. एका पत्रकाराने इंडी अलायन्सचा नेता कोण ह्या विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिले होते की पाच वर्षे आम्ही आपसात वाटून घेऊ .शरदजी देश म्हणजे काय परचुटन दुकान आहे का असा सवाल उपस्थित केला. तर नकली शिवसेनेचे भविष्य काय आहे हे यावेळी कळेल .यासाठी असली शीवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले . दरम्यान अगोदर एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या घटक नेत्यांचा समाचार घेतला .तर विवेक भाऊ , गावित आदी मान्यवरांनीही उपस्थितांना संबोधित केले .

Amit Shah Vasai

वसईच्या स्थानिक प्रसिद्ध मंदिरांना स्मरण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय , जय भवानी जय शिवाजी अशी भाषणाला सुरवात केलेले अमित शहा पुढे म्हणाले की, राहुल गांधींचे 50 वर्ष झाले तरी लॉंचिंग होत नाही .
हेमंत सवरांना मत म्हणजे विष्णू सवरांना श्रद्धांजली आणि तिसऱ्यादा मोदींजींचे सरकार .

BVA Vs BJP Palghar : बीजेपी नेताओं को लपक रही बविआ, अमित शाह के दौरे से पहले भाजपा पदाधिकारी ने किया बविआ में प्रवेश

Show More

Related Articles

Back to top button