मराठी न्यूज़पालघरमहाराष्ट्रमुंबईवसई-विरारविधानसभा चुनाव 2024
Loksabha Election Palghar Voting Update : पालघर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत अंदाजे 7.95 टक्के मतदान
Loksabha Election Palghar Voting Update : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 22 पालघर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत अंदाजे 7.95 टक्के मतदान
पालघर, दि. 20 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला 22 पालघर ( अ.ज ) लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली.
22 पालघर मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 7.95 टक्के मतदान झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील 22 पालघर मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे—
128 डहाणू – 8.16 टक्के
129 विक्रमगड – 9.70 टक्के
130 पालघर – 9.20 टक्के
131 बोईसर – 6.31 टक्के
132 नालासोपारा – 6.50 टक्के
133 वसई – 9.40 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.
Loksabha Election 2024 Voting Update : १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान