ठाणेपालघरमराठी न्यूज़

Accident : डहाणू येथे रिक्षा व दुचाकी यांचा भीषण अपघात, अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू तर पांच जण गंभीर जखमी

पालघर : डहाणू नाशिक राज्य मार्गावर वरोती ते सूर्यानगर दरम्यान सातवीपाडा येथे प्रवासी रिक्षा व दुचाकी यांची धड्क होत भीषण अपघात (Accident) झाला .

सोमवारी सकाळी दहा च्या दरम्यान रिक्षाने सूर्यानगर येथे जात असलेल्या प्रवासी रिक्षात शाळकरी मुली घेउन जात असताना सदर अपघात झाला. रीक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा समोरून येणाऱ्या दुचाकीवर धडकली या धडकेने अपघात ग्रस्त रिक्षा तेथील कालव्या च्या कथड्यावर चढून उलटली.

Accident

या अपघातात सूर्यानगर येथील असलेल्या आश्रमशाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलगी संगीता सुभाष डोकफोडे आठवी ,वय 14, हिचा गंभीर मार लागल्याने मृत्यु झाला, तर अंकिता राजेश हाडळ वय 14, नयना राजेश हाडळ वय 10 यांच्या डोक्याला मार बसला आहे, तर प्रवासी लता वेडगा ,.प्रमोद सुरेश लोहार तर दुचाकी चालक कैलास धानमेर यांना देखील मार बसला आहे. असून गंभीर जखमी ना गुजरात, वापी येथील रूग्णालयात पुढील उपचारा साठी पाठवण्यात आले आहे.

तर ईतर प्रवासी रमेश कोदे वय 40, रसिका कोदे वय 35, व रिक्षा चालक भास्कर डोकफोडे यांना जखमा झाल्या असून त्यांच्यावर कासा उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत।

VVCMC : महानगरपालिका प्रभाग समिती निहाय वृक्षप्राधिकरण विभागाचे नियंत्रण पथक

Show More

Related Articles

Back to top button