उत्तर प्रदेशमराठी न्यूज़मुंबई
CISF Costal Security awareness campaign: सीआईएसएफच्या कोस्टल सुरक्षा जनजागृती सायकल रॅलीचे वसईत स्वागत
ही सायकल रॅली १९ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी १७:०० वाजता पेल्हार पोलीस ठाण्यात पोहोचणार आहे. यावेळी मा. अप्पर पोलीस आयुक्त, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

वसई: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) च्या रेझिंग डे निमित्त कच्छ, गुजरात ते गोवा या दरम्यान कोस्टल सुरक्षा जनजागृती अभियान – “सुरक्षित तट, समृद्ध भारत” (CISF Costal Security awareness campaign) या विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सीआयएसएफ दलातील भारतीय पोलीस सेवेत (IPS) असलेले अधिकारी सहभागी होणार आहेत.
ही सायकल रॅली १९ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी १७:०० वाजता पेल्हार पोलीस ठाण्यात पोहोचणार आहे. यावेळी मा. अप्पर पोलीस आयुक्त, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी पत्रकार बंधूंनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे वार्तांकन करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्वागत समारंभ कार्यक्रम:
दिनांक: १९ मार्च २०२५
वेळ: सायंकाळी १७:०० ते २०:००
स्थळ: हॉटेल गोल्डन चारेट, मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्र. 48, वसई पूर्व
कार्यक्रमाचे आयोजक:
जितेंद्र वनकोटी
वपोनि, पेल्हार पोलीस ठाणे
Mandavi Virar murder Case: नाले से बरामद हुआ धड़, पत्नी की बेरहमी से हत्या कर पति ने काट दिया था सिर