देशपालघरमराठी न्यूज़मुंबईवसई-विरार

MMRDA : सूर्या पाणी पुरवठा प्रकल्पातील शाफ्टच्या खोदकामादरम्यान माती खचली, कार्यतत्परतेने एमएमआरडीएने बचाव कार्य सुरू केले

मुंबई, ३० मे, २०२४: एमएमआरडीएच्या (MMRDA) माध्यमातून वसई खाडी जवळील सासूनवघर गावात सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू आहे. बुधवार दिनांक २९मे, २०२४ रोजी रात्री साधारण ९ च्या सुमाराचा प्रकल्पाचे काम सुरू असताना दुर्दैवी घटना घडली आहे. वसई खाडी ओलाडण्यासाठी टनल बोरिंग मशीन च्या साहाय्याने भूयारीकरणाचे काम प्रस्तावित आहे.

या कामासाठी टनल बोरिंग मशीन जमिनीच्या भूभागात सुमारे ३२ मीटर खोलीवर पोहचवण्यासाठी लॉन्चिंग शाफ्ट चे खोदकाम सुरू होते. सदर काम हे सुरक्षा उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून हाती घेण्यात आले होते. तसेच एकूण ३२ पैकी सुमारे २० मीटर चे काम पूर्ण झाले असता अचानक तेथील माती खचल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेमध्ये एक पोक्लेन ऑपरेटर अडकला असून त्याचे बचाव कार्य सुरू आहे.

बचावकार्य तत्परतेने आणि सुरक्षितपणे पार पाडण्याचे महानगर आयुक्तांनी दिले आदेश

सदर घटनेची माहिती मिळताच एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांनी तातडीने दखल घेत घटनास्थळी उपलब्ध साधन आणि मनुष्यबळाचा वापर करून तातडीने बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश दिले. त्यासोबतच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (NDRF), पोलिस दल, अग्निशमन दल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह स्थानिक प्रशासनास तातडीने सूचित करण्याबाबत आदेश दिले. एमएमआरडीएमार्फत बचाव कर्य सुरू असताना एनडीआरएफची टीम पहाटे ५:०० वाजता घटनास्थळी पोहोचली आहे.

सध्या सुरू असलेल्या बचाव कार्यात मदत करण्यासाठी एमएमआरडीएचे अभियंते आवश्यक मदत देण्यासाठी आणि बचाव कार्यावर देखरेख करण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. घटना घडल्यापासून एमएमआरडीएची टीम घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अडकलेल्या ऑपरेटरला सुरक्षितपणे बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करून, बचाव कार्याला प्राधान्य दिलं गेलं आहे.. एमएमआरडीए, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाचे एकत्रित प्रयत्न ही आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावत आहे.

घटनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी नियुक्त केली विजेटीआयची टीम

घडलेल्या घटनेचा सखोल तपासणी करण्यासाठी आणि कारण शोधण्यासाठी, एमएमआरडीएने VJTI मधील स्ट्रक्चरल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. अभय बांबोळे यांना नियुक्त केले आहे. प्रा. बांबोळे यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि लवकरच त्यांच्या निष्कर्षांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याची अपेक्षा आहे. सदर घटनेचा तपास जसजसा पुढे जाईल आणि अधिक माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे अधिक तपशील प्रदान केले जातील.

एमएमआरडीए आपल्या कामगारांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सक्षम आहे.

Show More

Related Articles

Back to top button