Social Media Awareness: सोशल मीडियाचा वापर करताना महिला आणि विद्यार्थिंनी विशेष काळजी घ्यावी: अश्वती दोर्जे IPS
वसईत विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे व खादी ग्रामउद्योग च्या प्रमुख हिना भट्ट यांच्या उपस्थितीत वसईत महिला दिन संपन्न

वसई : सोशल मीडियाचा (Social Media Awareness) वापर करताना महिला आणि विद्यार्थिंनीनी काळजी घ्यावी. खासगी माहिती, फोटो शेअर करताना विशेष काळजी घ्यावी; तसेच सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवू नये, तसेच सोशल मीडियावरून कोणी त्रास देत असेल तर तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा.
महिला व मुलांवरील अन्याय अत्याचारासाठी 8657222777 व 9777777980 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच सायबर फसवणूकीसाठी 1930 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov. in वर संपर्क करा. असे आवाहन जागतिक महिला दिनी विशेष पी.सी. डब्लयु. सी.च्या पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे (आयपीएस) यांनी उपस्थित महिलांना केले.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश, केरळ प्रकोष्ट चे संयोजक यांच्या अध्यक्षतेखाली वसई (पू.), वसंत नगरी, बालाजी हॉल येथे वसई तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, महिला सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीत “प्रतीक्षा फाउंडेशन”च्या माध्यमातून “जागतिक महिला दिन” संपन्न झाला.
कार्यक्रमास केंद्रीय खादी ग्राम उद्योग बोर्ड, जम्मू काश्मीर च्या अध्यक्ष डॉ. हिना शफी भट यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली, यावेळी बोलताना त्यांनी महिलांच्या पाठीशी महिलांनी उभे राहणे गरजेचे आहे. आज महिलाच महिलांना मागे खेचतात असे मला ऐकवत येते तेव्हा वाईट वाटते, असे यावेळी त्या म्हणाल्या.
कार्यक्रमात प्रतीक्षा फाउंडेशन च्या”दुर्गा शक्ती अवॉर्ड” ने यावेळी डॉ. अल्मास खान, डॉ. योजना जाधव, गीता अहिरे, प्रो. उज्ज्वला गायकवाड, डॉ. ललन पळस्कर, प्रद्या कुलकर्णी, प्रीती काळे, कमल वर्तक, मालिनी सातपुते आदींना सन्मानित करण्यात आले.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, अशासेविकांच्या पगार वाढीसाठी आम्ही एक लढा उभा केला होता त्यावेळी चित्र वाघ त्या कार्यक्रमास आल्या होत्या त्यानंतर भाजपा-महायुती सरकार काळात त्यांना पगारवाढ मिळाली. कोरोना काळात आशा सेविकांशी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राशी माझा संबंध आला. त्यावेळी त्यांनी केलेले काम कोणीही विसरता कामा नये. असे यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रद्या कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धेश तावडे, विनोद सक्सेना, श्रीकुमारी मोहन, कल्पना नागपुरे, पूनम कुमार, बाळा सावंत, सतेंद्र रावत, जिग्ना पिटवा, स्मिता वेंगरूर्लेकर आदींनी विशेष मेहनत घेतली.
Virar Crime: विरार में खौफनाक हत्या: हाईवे के पास बैग में मिला महिला का कटा सिर!