विधानसभा चुनाव 2024पालघरमराठी न्यूज़वसई-विरार

Loksabha Election 2024 Palghar : 4 उमेदवारांचे 5 उमेदवारी नामनिर्देशनपत्र अपात्र, बळीराम जाधव यांनी अर्ज मागे घेतला

Loksabha Election 2024 Palghar : छाननी अंती 13 उमेदवारांचे 21 नामनिर्देशनपत्र पात्र तर 4 उमेदवारांचे 5 नामनिर्देशनपत्र अपात्र

पालघर : 22 – पालघर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 26 नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्याची छाननी आज करण्यात आली. त्यानुसार 13 उमेदवारांचे 21 नामनिर्देशनपत्र पात्र तर 4 उमेदवारांचे 5 नामनिर्देशनपत्र अपात्र ठरविण्यात आले आहेत..

जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया करण्यात आली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, जनरल ऑब्झरवर अजयसिंह तोमर, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संजिव जाधवर, तहसीलदार सचिन भालेराव आदी उपस्थित होते.

छाननी अंती सुरेश गणेश जाधव (अपक्ष), परेश सुकूर घाटाळ (अपक्ष) 2 अर्ज, राजेश दत्तू उमतोल (अपक्ष), भावना किसन पवार (अपक्ष) यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. तर बळीराम सुकूर जाधव (बहुजन विकास आघाडी) यांनी अर्ज मागे घेतला.

Heat Wave Alert : उष्णता वाढली आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी, – जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचे आवाहन

Show More

Related Articles

Back to top button