मराठी न्यूज़पालघरवसई-विरारविधानसभा चुनाव 2024
Wadhvan Port : बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा उमेदवार आ.राजेश पाटील यांनी दिली वाढवण गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या
पालघर : आज आमदार राजेश पाटील यांनी त्यांच्या प्रचारार्थ डहाणू शहर आणि वाढवण गावाला (Wadhvan Port) भेट दिली. ह्यावेळी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना त्यांनी होऊ घातलेले विनाशकारी वाढवण बंदर आणि यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांचा रोष गावकऱ्यांच्या डोळ्यात दिसत होता.
परंतु माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वाढवण बंदर विरोधी भूमिका सुरुवाती पासूनच घेतली होती आणि आजही उपस्थित गावकऱ्यांना माझी सुद्धा वाढवण विरोधी भूमिका कायम राहील असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी दिले. तसेच चिंचणी येथे बहुजन विकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे पालघर विधानसभा अध्यक्ष सुरेश पाडवी, बहुजन विकास आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सारस जाधव,अंकुश दादा कोथमिरे,रणधीर कांबळे, वाढवण गावचे किरण पाटील यांच्या सह अनेक बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते।