विधानसभा चुनाव 2024देशमराठी न्यूज़मुंबईराजनीति

CM Yogi Adityanath at Nalasopara : उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १८ मे रोजी नालासोपाऱ्यात!

CM Yogi Adityanath at Nalasopara : पालघर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या वसई येथील विराट सभेनंतर उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १८ मे रोजी नालासोपाऱ्यात येत असल्याची माहिती भाजपा वसई विरार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे.

पालघर लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचे आयोजन भाजपच्या वतीने नालासोपारा पश्चिम, श्रीप्रस्था रोड येथील (फनफिएस्टा थिएटर) जवळ असलेल्या स्व. श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर सकाळी ११.३० वाजता करण्यात आले असल्याने वसई विरार व पालघर जिल्यातील भाजपा कार्यकर्त्यांसह समस्त हिंदुत्ववादी संघटनेत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असलेले उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पालघरच्या रणांगणात उतरवल्याने आणि त्यांची सभा बहुसंख्य उत्तर प्रदेशीय राहत असलेल्या ठिकाणी व त्यांच्यात योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल असलेली क्रेझ. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे मे २०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत योगी आदित्यनाथ यांची तोफ वसईत धडाडली होती. त्यानंतर पुन्हा ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने वसई-नालासोपारा येथे येत आहेत. या सभेतून पुन्हा एकदा त्यांचे प्रखर राष्ट्रप्रेमी व हिंदुत्ववादी विचार ऐकण्याची संधी वसई-विरारकरांनासह समस्त पालघर वासियांना प्राप्त झालेली आहे.

दरम्यान; केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरिया कायदा रद्द करणे, ३७० कलम, राममंदिर आणि देशाची सुरक्षा अशा महत्त्वपूर्ण विषयांतील महत्त्व संपूर्ण पालघर जिल्हावासीयांना पटवून दिले होते. तर योगी आदित्यनाथ या सभेतून कोणता संदेश देतात, कुणाचा समाचार घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nitesh Rane At Palghar : हिंदू म्हणून हिंदूंचे सण उत्साहात साजरे करायचे असतील तर महायुतीलाच मतदान करण्याशिवाय पर्याय नाही: आमदार नितेश राणे

Show More

Related Articles

Back to top button