BVA : बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश रघुनाथ पाटील यांना अनेक संघटनांचा पाठींबा
पालघर लोकसभा मतदार संघाचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. उमेदवार च्या प्रचाराचे शेवटचे काही तास आता उरलेले आहेत. बहुजन विकास आघाडीचे (BVA) अध्यक्ष हितेंद्र ठाकूर व उमेदवार राजेश पाटील हयांनी संपूर्ण पालघर मतदार संघ पिंजून काढलेला आहे.
आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर व राजेश पाटील हयांनी आपल्या मतदार संघात अनेक विकास कामे केलेली आहेत. परंतु केंद्रातील विकासाच्या योजना जर जिल्हयासाठी मंजूर करून आणायच्या असतील तर आपला हक्काचा खासदार असणे आवश्यक आहे. माजी खासदार बळीराम जाधव हयांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे लोकांसमोर घेऊन राजेश पाटील जिल्हयातील विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, पालघर, बोईसर, डहाणू येथील खेडयापाडयात लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत त्याचा नक्कीच फायदा उमेदवार राजेश पाटील हयांना होणार आहे.
मागील दहा वर्षात पालघर जिल्हयाचा विकास रखडलेला आहे. जिल्हयातील आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. हया प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच जिल्हयातील किनारपट्टीचा विकास, निसर्ग संपन्न भागांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे, जव्हार मोखाडयातील पाणी प्रश्न, रेल्वेचे प्रलंबित प्रश्न, रोजगारांचे प्रश्न, पेन्शनधारकांचे प्रश्न, मच्छिमार बांधवांचे प्रश्न अशा अनेक योजनांसाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील हयांच्या सारख्या होतकरू तरूणाला निवडून दिल्यास जिल्हयातील रखडलेली विकासाची होणार आहेत.
मतदार संघातील गणीते वेगवेगळ्या जाती धर्मावर, एक दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करण्यावर गेलेली आहेत. विकास कामे करणारा पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडी पक्षाची जिल्हयात ओळख आहे. निवडणुकीत पालघर लोकसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडीची विकास कामे बघुन लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर हयांचा कार्यावर प्रभावित होऊन आर्यन आदिवासी फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य, पालघर जिल्हा नाभीक समाज सेवा संघ, हिंदू मुस्लीम एकता सामाजिक संस्था, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ समस्त जैन समाज, विरार, आई जीवदानी कृपा होलसेल भाजी-पाला विक्रेता युनियन, लेवा पाटील समाजोन्नती मंडळ, विरार, कुणबी समाजोन्नती संघ, अखिल भारतीय जनहित सेवा संघ, भारतीय साहू (तेली) समाज पालघर अशा अनेक संघटनांनी बहुजन विकास आघाडी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार राजेश रघुनाथ पाटील यांना आपला पाठींबा जाहीर केलेला आहे.
CM Yogi at Mumbai Nalasopara : मुंबई के नालासोपारा में दहाड़ेंगे योगी आदित्यनाथ