पालघरमराठी न्यूज़महाराष्ट्रमुंबईराजनीतिराज्यवसई-विरारविधानसभा चुनाव 2024

Palghar : मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित ठेवल्याबाबत चौकशी होऊन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावी- प्रदीप चंद्रकांत मेस्त्री

२२ पालघर (Palghar) (अ.ज.) लोकसभा मतदार संघातील लोकांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित ठेवल्याबाबत चौकशी होऊन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई व्हावी ….संभाजी ब्रिगेड पक्षाचे महानगर अध्यक्ष प्रदीप चंद्रकांत मेस्त्री यांची मागणी

विरार, दिनांक २१ मे. २०२४ : लोकसभा निवडणूक २०२४ च्या जाहीर कार्यक्रमानुसार पालघर जिल्हा लोकसभा मतदार संघात दि. २० मे २०२४ रोजी मतदान कार्यक्रम पार पडला आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता मतदान केंद्रावर येत असताना फोन द्वारे मिळणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीनुसार तसेच मतदान केंद्रावरील मिळालेल्या माहिती नुसार पालघर जिल्ह्यातील याआधी मतदार यादीत नावे समाविष्ट असणाऱ्या अनेक मतदारांची नावे कोणतेही कारण नसताना किंवा मतदारांना कोणतीही पूर्व सूचना न देता तसेच मतदारांनी नावे वगळण्याकरिता कोणताही अर्ज केला नसताना नावे वगळण्यात आल्याने बहुसंख्य मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिले आहेत.

तरी भारतीय संविधानाने भारतातील नागरिकांना दिलेल्या मतदानाच्या हक्काचा भंग झाला असून एकत्रितपणे लाखोंच्या संखेने मतदारांची नावे अचानक वगळण्यामागे एखाद्या राजकीय पक्षाचा कपटी डाव असण्याची शक्यता असून शासकीय यंत्रणेतील अधिकारी – कर्मचारी यांच्या संगनमताने हा सदरचा प्रकार घडला आहे.

त्यानुसार सदर प्रकरणी तातडीने संक्षिप्त चौकशी होऊन संबंधित दोषींवर भारतीय दंड संहिता १८६० च्या योग्य त्या कलमानुसार फौजदारी गुन्हे दाखल होऊन कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच सदर प्रकरणाचा चौकशी अहवाल आणि केलेल्या कारवाईचा तपशील लिखित स्वरूपात प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी सहित आम्हाला मिळावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे वसई विरारचे महानगर अध्यक्ष श्री. प्रदीप मेस्त्री यांनी मा. राज्य निवडणूक आयुक्त आणि इतर संबंधित शासकीय प्राधिकारण ह्यांना ईमेलद्वारे पत्रव्यवहार करून केली आहे.

संभाजी ब्रिगेड मार्फत करण्यात आलेली तक्रार पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/14QvEKPO0FH8NjUJUST8PsrfmmV0bDo_h/view?usp=sharing

Loksabha Election Palghar Voting Update : पालघर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत अंदाजे 7.95 टक्के मतदान

Show More

Related Articles

Back to top button