मनोरंजनमुंबईवसई-विरार

MSEDCL Vasai Virar : महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजी आणि बेजबाबदारपणामुळे वीजग्राहकांना मनस्ताप !

MSEDCL Vasai Virar : भाजपचे वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील यांच्याकडून महावितरणची कानउघाडणी

  • वीज वितरण नियोजनात अनागोंदी
  • तातडीने उपाययोजना करण्याचे तसेच वीज ग्राहकांना वीज खंडित होण्याबद्दल तातडीने माहिती देण्याचे कार्यकारी अभियंता प्रविण सुते यांचे आश्वासन

वसई : विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा व वाढ करणे आवश्यक असताना उपलब्ध असलेल्या वितरण व्यवस्थेतून अधिकाधिक वीज पुरविण्याच्या मानसिकतेमुळे वीज वितरण व्यवस्थेवर ताण येऊन थोड्याश्या कारणाने 12 ते 14 तास वीजपुरवठा बंद होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत आणि यास महावितरण अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा संताप मनोज पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्या सोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला.

वारंवार वीज जाणे तसेच त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना न मिळणे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळणे यामुळे वसईमधील वीज ग्राहक त्रस्त असताना गेले 5 ते 6 दिवस सुरू असलेल्या विजेच्या गोंधळामुळे वीज ग्राहक संतप्त असून त्याचा कडेलोट झाला तर महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसेल, असा इशारा मनोज पाटील यांनी दिला.

‘वसई आणि परिसरात आज हजारो-लाखो चौरस फुटांची बांधकामे उभी राहत आहेत. या संकुलासाठी लागणारा वीजपुरवठा करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर आणि सब-स्टेशनची गरज असते. त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देणे, हे संबंधित बांधकाम व्यावसायिकांचे कर्तव्य होते. तर त्यांच्याकडून या जागा हस्तांतरित करून घेणे, ही जबाबदारी महाविरणची होती. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली नाही. याचे परिणाम आज सर्वसामान्य वीज ग्राहकांना भोगावे लागत आहेत. किंबहुना महावितरणने अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा औद्योगिक बांधकामांना वीज देऊन सामान्य वीज ग्राहकांना वेठीस धरलेले आहे,` अशा शब्दांत भाजपचे वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

मागील काही दिवसांपासून वसई आणि परिसरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. या समस्येची दखल घेऊन वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या शिष्टमंडळाने वसई विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण सुते यांची भेट घेतली व या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली. प्रसंगी वाढती विजेची मागणी आणि त्यावर असलेला ताण यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे कारण प्रवीण सुते यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले. शिवाय वसई-कामण व विरार-नारिंगी येथील स्वीचिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर वीज ग्राहकांना यातून दिलासा मिळेल, असे कामचलाऊ उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या या उत्तराने संतापलेल्या मनोज पाटील यांनी त्यांना अतिरिक्त माहिती देत फैलावर घेतले. 2014 पासून या दोन्हीही स्वीचिंग स्टेशनकरता भाजपच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. किंबहुना तत्कालिन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व तत्कालिन पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांची वसईत आणि मंत्रालयातही बैठक झाल्याची आठवण मनोज पाटील यांनी सुते यांना करून दिली. परंतु महावितरण या कामांचा पाठपुरावा करण्यात अपयशी ठरले, असा संताप पाटील यांनी व्यक्त केला.

वीजपुरवठ्यावर ताण असेल तर अनधिकृत बांधकामे किंवा बेकायदेशीर गोदामे यांना अनावश्यक सप्लाय देणे थांबवा व अधिकृत बांधकामधारकांकडून महाविरणला आवश्यक जागा हस्तांतरित करून घ्या, अशा सूचनाही मनोज पाटील यांनी या प्रसंगी केल्या. महावितरणच्या नियमावलीत या संबंधीची सर्व माहिती आहे. मात्र महाविरणचे अधिकारी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाहीत. शिवाय कायदा आणि नियमात काम करत नसल्याने नव्या आणि जुन्या अशा सर्वच वीज ग्राहकांना याचे परिणाम आज भोगावे लागत असल्याचे संतप्त विधान मनोज पाटील यांनी केले.

विशेष म्हणजे; वसईला भूमिगत वीजवाहिनी टाकण्याकरता 184 कोटींचा प्रस्ताव होता. सिंधुदुर्ग आणि अन्य भागांतील प्रस्ताव मार्गी लागले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून उशिरा कार्यवाही झाल्याने हा वसईचा प्रस्ताव रखडला, अशी आठवणही मनोज पाटील यांनी करून दिली. यासाठी महाविरणच्या अधिकाऱ्यांनी दक्ष असायला हवे होते. ती त्यांची जबाबदारी होती. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पायाभूत सुविधांवर काम केले नाही. यासाठी मागील 10 वर्षे आपण पाठपुरावा करत असल्याची माहितीही मनोज पाटील यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रवीण सुते यांना दिली.

दरम्यान; वसई आणि परिसरात सातत्याने घेण्यात येत असलेल्या लोडशेडिंगमुळे सर्वसामान्य ग्राहकांत प्रचंड राग आहे. अनेक जण मुंबईत कामाला जातात. दिवसभराच्या थकव्यानंतर त्यांना अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागते; तेव्हा ते अधिक संतापतात. त्यांचा हा कधी तरी आमच्यावरही येऊ शकतो. त्यामुळे सद्यस्थितीत उद्भवणारी समस्या कशी सुटेल? आणि त्यासाठी महाविरणकडून कोणते प्रयत्न सुरू आहेत? अशी विचारणा सरतेशेवटी मनोज पाटील यांनी केली. त्यावर महावितरणकडे कर्मचारी तुटवडा आहे, अशी खंत सुते यांनी व्यत केली. परंतु उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या योग्य त्या प्रकारे ड्युटी लावून सर्वसामान्य वीज ग्राहकांना अडचण निर्माण होणार नाही; किंबहुना त्यांना सर्व त्या गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता प्रवीण सुते यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले आहे.

Mumbai Local : मुंबई लोकल में महिला से शारीरिक संबंध बनाने की मांग, आरोपी गिरफ्तार

Show More

Related Articles

Back to top button