मुंबईमराठी न्यूज़वसई-विरार

Vasai pre-monsoon inspection: वसई तालुक्यातील पावसाळापूर्व नालेसफाईचा आमदारांकडून महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा *

" यंदा शहरात पाणी तुंबता कामा नये " आमदार स्नेहाताई दुबे-पंडित यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

वसई- येत्या पावसाळ्यात (Vasai pre-monsoon inspection) नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, वसईत पाणी तुंबता नये ,यासाठी वसई-विरार महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन तयारी करत आहे. याबाबत सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यास आज वसईच्या आमदार स्नेहा ताई दुबे-पंडित यांनी सुरुवात केली.

WhatsApp Image 2025 04 25 at 16.50.19 5fe5659a scaled

या पाहणी दौऱ्याची सुरुवात करताना आज आमदार सौ. स्नेहाताई दुबे पंडित यांनी १) कर्मवीर भाऊराव पाटील शाळा, जुचंद्र
२) पंचवटी ब्रिज ते मधुबन नाला
३) नवघर पूर्व शमशानभूमी ते राजावली पूल
४) सन सिटी, टोकपाडा टी पॉइंट नाला
५) पापडी औद्योगिक वसाहत नाला
६) जी. जी. कॉलेज नाला या प्रमुख नाल्यांच्या जागेवर जाऊन तेथे सुरु असलेल्या नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

Vasai drain cleaning

या दौऱ्यादरम्यान प्रत्येक नाल्याच्या ठिकाणी तेथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना बोलावून त्यांच्याकडून पावसाळ्यात होणाऱ्या पूर परिस्थितीची तसेच इतर अडचणींची माहिती घेतली व आता सुरू असलेली नालेसफाईची कामे पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात त्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही याची महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून खात्री करून घेण्यात आली.

Vasai drain cleaning

आता सुरू असलेली कामे तातडीने व पूर्ण क्षमतेने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महोदयांनी महानगर पालिका अधिकऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे “नालेसफाई कामे वेळेत व गुणवत्तेने पूर्ण झाली पाहिजेत, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता हेच आपले सर्वोच्च प्राधान्य आहे, याची दक्षता घेण्याचे आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी यावेळी सांगितले.

Vasai drain cleaning

या पाहणी दौऱ्यात वसई,विरार शहर,महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी स्वतः उपस्थित राहून या कामाची तपशीलवार माहिती आमदार महोदयांना दिली . यावेळी नालेसफाई सुरू असलेल्या त्या – त्या 3 प्रभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे , संगीता घाडीगांवकर, अलका खैरे हे अधिकारी त्यांच्या विकास पाटील, निलेश जाधव, प्रभाकर धुमाळ , जितेंद्र नाईक या कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. तसेच वसई शहर मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर,वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष उदय शेट्टी, प्रवीण गावडे, अपर्णा पाटील, हर्षाली गावडे, धरेंद्र कुलकर्णी, नितीन भोईर, श्रीकांत चन्याल,सी. बी. मिश्रा, देवराम भाऊ. अक्षय कदम, राजेश नायर, हरीश बेदी, मनोज शर्मा हे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यानंतर पुढील आठवड्यात उर्वरित नाले सफाई च्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे.

Show More

Related Articles

Back to top button