Home मराठी न्यूज़ Nalasopara : जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये …..अ‍ॅड सतीश भोडंवे
मराठी न्यूज़

Nalasopara : जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये …..अ‍ॅड सतीश भोडंवे

Nalasopara

स्वाक्षरी आभियानात नागरीक आक्रामक…. !

प्रभागातील समस्यांमुळे नालासोपारा (Nalasopara) पश्चिम येथील नागरिकांमध्ये संताप.

नागरिकांच्या मनामध्ये संतापाची लाट आहे प्रभागातील छोट्या मोठ्या समस्या जश्या स्वच्छता, कचरा व्यवस्थापन , रस्त्यावरती पडलेले रेती, रेबीज, त्याचप्रमाणे पथदिवे, औषध फवारणी , धुर फवारणी, यासारख्या महत्त्वपूर्ण गरजा आणि सुख सुविधा महापालिकेच्या वतीने मिळत नसल्याने नालासोपारा पश्चिम मधील नागरिक संतप्त झाल्याचे दिसले. गेल्या अनेक दिवसापासून बिल्डिंगच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणे कचऱ्याचे साम्राज्य झाले होते रस्त्यावरील पथदिवे बंद झाले होते तसेच गटांची झाकणी तुटली होती गटरातील मलबा हा उचलण्यात येत नाही, या सर्व समस्या अ‍ॅड सतीश भोडंवे यांच्यापर्यंत नागरिकांनी पोहोचवल्या त्या अनुषंगाने आज दिनांक 26.11. 2023 रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून 1.00 वाजेपर्यंत स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्वाक्षरी अभियानामध्ये तब्बल 300 हुन अधिक नागरिकांनी सहभाग दाखवून राजकीय वर्तुळामध्ये खळबळ वाजवली आहे. सदर स्वाक्षरी अभियान उत्स्फूर्तपणे नागरिकांनी आयोजित केल्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होत असल्याचे प्रामुख्याने दिसले. स्वाक्षरी अभियानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग दिसून आला येणाऱ्या काळामध्ये लवकरच जर ह्या समस्येचे निवाकरण झाले नाही तर महापालिकेच्या विरोधात जनतेच्या वतीने आंदोलन केले जाईल असे मत विजय मांडवकर उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा यांनी व्यक्त केले त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने जर स्वच्छता होणार नसेल तर ती स्वच्छता करण्यासाठी आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छता अभियान घेण्याचे इशारा सतीश भोंडवे यांनी दिला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल प्रभागातील सर्व लोकांचे अभिनंदन सिद्धार्थ पराड व त्यांचे सहकारी यांनी केले. या स्वाक्षरी अभियानामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रभागातील साफसफाई सोबत रस्ते , पथ दीवे, कचरा साफसफाई, धुर फवारणी , या सारख्या समस्या नक्कीच सुटतील असा विश्वास अ‍ॅड.सतीश भोडंवे यांनी व्यक्त केला.

Recent Posts

Related Articles

महापालिकेच्या भरधाव कचरागाडीने धडक दिल्याने अ‍ॅक्टिवा चालकाचा जागीच मृत्यू
ताजा खबरेंमराठी न्यूज़

वसई-विरार महापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, चालक फरार

नालासोपारा, 27 जून 2025: नालासोपारा पश्चिमेतील समेळ गावात गुरुवारी दुपारी भीषण अपघातात...

Share to...