Home ताजा खबरें वसई-विरार महापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, चालक फरार
ताजा खबरेंमराठी न्यूज़

वसई-विरार महापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, चालक फरार

महापालिकेच्या भरधाव कचरागाडीने धडक दिल्याने अ‍ॅक्टिवा चालकाचा जागीच मृत्यू

नालासोपारा, 27 जून 2025: नालासोपारा पश्चिमेतील समेळ गावात गुरुवारी दुपारी भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. श्रवण घरटकर (रा. निळेमोरे, नालासोपारा पश्चिम) हा तरुण मित्रांसह समुद्रकिनारी जात असताना, दुपारी सुमारे १२ वाजता तो अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून समेळ येथील सोपारा इंग्लिश स्कूलसमोर पोहोचला असता, वसई-विरार महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या भरधाव गाडीने त्याला धडक दिली.

धडक एवढी जोरात होती की श्रवण गाडीच्या चाकाखाली आला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर कचरागाडीचा चालक वाहन सोडून फरार झाला. सदर गाडी महापालिकेच्या ठेकेदाराची असल्याचे निष्पन्न झाले असून, गाडीत कोणतेही अधिकृत कागदपत्र सापडले नाहीत.

🗣️ नागरिक संतप्त – मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, महापालिकेच्या कचरागाड्या नेहमीच वेगात धावत असतात आणि गतीरोधकाकडे दुर्लक्ष केल्याने अपघाताची शक्यता होतीच. ही भीती अखेर खरी ठरली. त्यामुळे नागरिकांनी सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Municipal Corporation Election Poll 2025: महाराष्ट्र सरकार ने जारी किया नया आदेश: पुणे, मुंबई, ठाणे सहित 10 महानगरपालिकाओं में चार सदस्यीय प्रभाग पद्धति से होंगे आगामी चुनाव

Written by
Metro City Samachar

Metro City Samachar एक डिजिटल न्यूज़ प्लेटफॉर्म है, जो मुंबई और MMR क्षेत्र की ताज़ा एवं स्थानीय खबरें उपलब्ध कराता है। हम वसई-विरार, नालासोपारा, पालघर, मुंबई, ठाणे, मीरा-भायंदर और नवी मुंबई से जुड़ी ब्रेकिंग न्यूज़, क्राइम, राजनीति, नागरिक समस्याओं और जनहित के मुद्दों को प्रमुखता से कवर करते हैं।

Related Articles

गणेश विसर्जन के दौरान मुंबई-अहमदाबाद हाईवे पर भारी वाहनों के प्रवेश पर प्रतिबंध
ताजा खबरेंमहाराष्ट्रमुंबई - Mumbai Newsवसई-विरार - Vasai-Virar News

गणेश विसर्जन के चलते मुंबई-अहमदाबाद हाईवे पर भारी वाहनों की एंट्री बंद, 25 सितंबर की रात से लागू

मीरा-भायंदर/वसई-विरार: गणेशोत्सव 2026 के विसर्जन को देखते हुए मीरा-भायंदर, वसई-विरार पुलिस आयुक्तालय...

Share to...