मुख्य समाचारठाणेमराठी न्यूज़महाराष्ट्रवसई-विरार

Question On VVCMC Monsoon Preparation : महापालिकेचे अधिकारी आणि अभियंते किती दिवस सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत राहणार? : मनोज बारोट

Question On VVCMC Monsoon Preparation : वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील अनेक जीर्ण रस्ते, मुख्य नाले व गटाराची तुटलेले झाकणे पावसाळ्यात सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत. अशा स्थितीत तालुक्यातील जनतेला पावसाळ्यात चिंता वाटणे ही सामान्य बाब राहिली नाही, कारण दरवर्षी पावसापूर्वी महापालिका आयुक्त बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देतात.

Question On VVCMC Monsoon Preparation

पण कंत्राटदार आणि कंत्राटी अभियंत्यांसमोर लाचार आपले मनपाचे अधिकारी जमिनीवर पाय ठेवण्याऐवजी वातानुकूलित केबिनमध्ये बसून बिल पास करण्यातच मग्न असतात. यामुळे दरवर्षी निष्पाप मुले, वृद्ध, सामान्य जनता आणि वाहनचालक तुटलेल्या रस्त्यावर पाणी साचल्याने किंवा नाळ्या आणि गट्टरांवरील उघड्या झाकण्यांमुळे त्यात पडून जखमी होतात किंवा जीव सुद्धा गमवतात. दरवर्षी अशा अप्रिय घटना घडत असतानाही अधिकाऱ्यांना आपली जबाबदारी कधी समजणार? असा सवाल तालुक्यातील सर्वसामान्य जनता व करदात्यांकडून व्यक्त केला जात आहे.

सर्वसामान्य जनतेचे या त्रास व पिडाबाबत भाजपा वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना कळवले आहे की, पावसाळा कधीही दार ठोठावू शकतो परंतु परिसरातील अनेक रस्ते, मुख्य गटारे आणि नाळेचे झाकण अनेक ठिकाणी दयनीय अवस्थेत दिसत आहेत. मात्र अधिकारी, अभियंते, कंत्राटी अभियंते यांना या सगळ्याची माहितीच नसल्याचे दिसून येत आहे.

Question On VVCMC Monsoon Preparation

तसेच दरवर्षी पाणी साचल्याने नाल्यांच्या साफसफाईबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याने याकडे विशेष लक्ष देण्याची विनंतीसह बारोट यांनी आयुक्तांकडे अशी मागणी केली आहे की, नागरीकांचा सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नऊ प्रभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देणारे कठोर आदेश जारी करण्यात यावे व त्यांना सूचना देण्यात यावे की जर कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी संबंधित अधिकारी अभियंता व त्या प्रभागाचे कंत्राटी अभियंता जबाबदार राहतील. कारण जोपर्यंत अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना आपली जबाबदारी समजणार नाही आणि निष्पाप नागरिक ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे बळी ठरतं राहतील.

Palghar Derailment Update : युद्ध स्तर पर कार्य, दहानू से विरार के बीच ट्रेनों का अस्थाई ठहराव

Show More

Related Articles

Back to top button