Home महाराष्ट्र पालघर - Palghar News Rajesh Patil BVA : साई मंदिरात बाबांचे दर्शन घेत व लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडत, आज पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्री गणेश
पालघर - Palghar Newsमनोरंजनमराठी न्यूज़मुंबई - Mumbai Newsविधानसभा चुनाव 2024

Rajesh Patil BVA : साई मंदिरात बाबांचे दर्शन घेत व लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडत, आज पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्री गणेश

Rajesh Patil BVA

पालघर : (Rajesh Patil BVA)  शिरसाड भामटपाडा येथिल साई मंदिरात बाबांचे दर्शन घेत व लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडत, आज पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्री गणेशा मोठ्या उत्साहात करण्यात आला.

Rajesh Patil BVA

यावेळी प्रचंड जनसमुदाय लोटला होता, लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या धडाकेबाज समाजोपयोगी व जनकल्याण कामांना प्रचंड प्रतिसाद देत प्रचाराच्या शुभारंभाला लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते, तसेच रहिवासी उपस्थित होते.

Rajesh Patil BVA

यावेळी माननीय आमदार राजेश पाटील यांच्यासोबत माननीय माजी खासदार बळीराम जाधव, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमन राजेंद्र पाटील,वसई पंचायत समितीचे सभापती अशोक पाटील, माजी नगरसेविका जयश्री कीनी,कान्हेय्या भोईर,मिलिंद घरत,जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग पाटील,आणि बाजार समितीचे सर्व संचालक,विभागातील सर्व आजी माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Rajesh Patil BVA

गाव पाड्यातून व शहरातून प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला पुरुष तसेच वयस्क मंडळी आपणहून प्रचारात पुढाकार घेत असल्याचे दिसत असून यावेळी पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना एक दिलाने व भरघोस मताने विजयी करणार असा विश्वास मतदार राजाकडून व्यक्त होताना दिसत आहे.

Wadhvan Port : बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा उमेदवार आ.राजेश पाटील यांनी दिली वाढवण गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या

Related Articles

Share to...