पालघर : बविआ उमेदवार राजेश पाटील (Rajesh Patil BVA) यांनी आज तीर्थक्षेत्र परशुराम कुंड, तुंगारेश्वर पर्वत येथे बालयोगी श्री सदानंद महाराज यांची भेट घेऊन त्यांच्या आशिर्वादाने प्रचारकार्य सुरू केले.
दोन दिवसांपूर्वी या अगोदर राजेश पाटील यांनी वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो, तसेच तलासरी येथे चर्च मध्ये फादर जो सर यांची देखील भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
आज शिरसाड भामटपाडा येथून त्यांच्या निवडणूक प्रचाराचा श्री गणेशा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला. बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदारअसलेले राजेश पाटील यांनी मागील चार वर्षाच्या कारकिर्दीत केलेली समाजोपयोगी व जनकल्याण कार्य त्यांना यावेळी प्रचारात कामी येताना दिसत आहेत.
मतदारसंघातील ग्रामीण भागासोबत शहरी भागातूनही त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.