मराठी न्यूज़वसई-विरार

Vasai Virar Marathon 2023 : तीर्था पुनने जिंकली वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन

गोरखा रेजिमेंट (दार्जिलिंग) च्या तीर्था पुनने वसई विरार महानगरपालिका आयोजित ११ व्या राष्ट्रीय वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन २०२३ (Vasai Virar Marathon 2023) स्पर्धेमध्ये २:२१.४८ अशी वेळ नोंदवत गतविजेता मोहित राठोरला मागे टाकून पूर्ण मॅरेथॉन जिंकली.

  • नुरहसन, प्राजक्ता ठरले अर्ध मॅरेथॉन विजेते

वसई विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी विरारमध्ये समारोप झाला.
निम्म्याहून अधिक अंतर पार करून पुनसोबत चालणाऱ्या राठोरला ३० किमीच्या टप्प्यावर क्रॅम्पिंग सुरू झाले आणि तो मागे पडला, परंतु तरीही त्याने आपला अनुभव व उर्जेचा वापर करून २:२६.४३ अशी वेळ नोंदवून दुसरे स्थान पटकावले, जे विजेत्यापेक्षा जवळपास पाच मिनिटे मागे होते. चंपावत, उत्तराखंडचा तडाखे सिकंदर चिंधू हा २:२८.३६ वेळेसह तिसरा आला. तीर्थ पुन या हाफ मॅरेथॉन धावपटूने यावेळी पूर्ण मॅरेथॉन जिंकून ३ लाख रुपयेचे बक्षीस मिळवले, तर मोहित राठोरला २ लाखाच्या बक्षिसावर समाधान मानावे लागले.

पुरुषांची अर्ध मॅरेथॉन एमडी नुरहसनने १:०४.४५ वेळेत पूर्ण करून जिंकली. यापूर्वीच्या २०२२ च्या पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये अनिश थापाने सेट केलेल्या १:०४.३७ च्या कोर्स विक्रमापासून तो केवळ ८ सेकंद मागे राहिला. पुनीत यादवने १:०४.४९ सेकंदाची वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले, त्यानंतर अरुण राठोडने १:०४.५३ मध्ये हि वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला.

महिलांची अर्ध मॅरेथॉन नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेने १:१८.१२ ची वेळ नोंदवत जिंकली, १:२०.०९ वेळ नोंदवत तमसी सिंगने दुसरे स्थान पटकावले तसेच फुलन पाल १:२०.२८ वेळेसह तिसऱ्या स्थानावर राहिली. दोन्ही अर्ध मॅरेथॉन विजेत्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये मिळाले.
या राष्ट्रीय स्तरावरील वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन २०२३ स्पर्धेमध्ये विविध उच्चपदस्थ मान्यवरांपैकी पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी कैलास शिंदे (IAS) यांच्यासह कृष्ण प्रकाश (IPS) आणि विश्वास नांगरे पाटील (IPS) यांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धा विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे :

) पूर्ण मॅरेथॉन (एलिट पुरुष गट): तीर्था पुन ०२:२१:४८; मोहित राठोर ०२:२६:४३; तडाखे सिकंदर चिंधु ०२:२८:३६.

) पूर्ण मॅरेथॉन (खुला पुरुष गट): मनोज कुमार यादव ०२:२७:२५; निखिल सिंग ०२:२९:५३; भगतसिंग वळवी ०२:३०:५९.

) पूर्ण मॅरेथॉन (महिला खुला गट): अश्विनी जाधव ०३:०६:३८; अभिलाषा भगत ०३:२२:४८; नूतन एन ०३:२३:४४.

) हाफ मॅरेथॉन (एलिट पुरुष गट): मो. नुरहसन ०१:०४:४५; पुनीत यादव ०१:०४:४९; अरुण राठोड ०१:०४:५३.

) हाफ मॅरेथॉन (एलिट महिला गट): प्राजक्ता गोडबोले ०१:१८:१२; तामसी सिंग ०१:२०:०९; फुलन पाल ०१:२०:२८.

Vasai Virar Marathon 2022 : गतविजेता मोहित राठोर नव्या विक्रमासह बनला १० व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन २०२२ चा विजेता

Show More

Related Articles

Back to top button