मराठी न्यूज़वसई-विरार
Aadhar Card Camp : भव्य आधार कार्ड शिबीरास नालासोपारात नागरीकांचा उत्सुर्फ प्रतिसाद…
नालासोपारा :- स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या वतिने व शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या माध्यमातून नालासोपारा येथे भव्य दोन दिवसीय आधार कार्ड शिबीराचे (Aadhar Card Camp) आयोजन करण्यात आले होते.शिबीरात एकुण 160 नागरीकांनी लाभ घेतला.
आधार कार्ड शिबीराअंतर्गत आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक करणे, नविन आधार कार्ड, आधार कार्ड दुरूस्ती, मोबाईल नंबर लिंक करणे, बायोमेट्रिक करणे इत्यादी सेवा देण्यात आले. या उपक्रमास नागरीकांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला.
यावेळी आधार कार्ड शिबीराचे उध्दघाटन उपशहरप्रमुख महेश निकम यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, उपशहरप्रमुख महेश निकम, विभागप्रमुख गणेश मुनगेकर शाखा प्रमुख वंदनाताई ढगे व पदाधिकारी उपस्थित होते.
VVCMC : महानगरपालिका प्रभाग समिती निहाय वृक्षप्राधिकरण विभागाचे नियंत्रण पथक