Home मराठी न्यूज़ Mazi Ladki Bahin Yojana : वसई विरार शहर महानगरपालिकेकडे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे ५५ हजार अर्ज
मराठी न्यूज़मुंबई - Mumbai Newsवसई-विरार - Vasai-Virar News

Mazi Ladki Bahin Yojana : वसई विरार शहर महानगरपालिकेकडे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे ५५ हजार अर्ज

Mazi Ladki Bahin Yojana

विरार : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना (Mazi Ladki Bahin Yojana) महाराष्ट्र शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या ९ प्रभाग समित्यांमध्ये वॉर्डनिहाय ११५ मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून महिला लाभार्थ्यांना मदत कक्षांमध्ये जाऊन विनामुल्य अर्ज करता येत आहेत. तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण ४१३ अंगणवाडी केंद्रांमार्फतही विनामुल्य अर्ज घेतले जात आहेत. आतापर्यंत महानगरपालिका कार्यक्षेत्रात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे एकूण ५५,२१९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये महानगरपालिकेच्या मदत कक्षांमार्फत २४,०१० व अंगणवाडी केंद्रांमार्फत १९,२५९ तसेच आशा सेविकांमार्फत ११,९५० महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत.

महानगरपालिकेच्या मदत कक्षांची व अंगणवाडी केंद्रांची यादी महानगरपालिकेच्या ९ प्रभाग समिती कार्यालयांमध्ये त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या vvcmc.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सोशल मिडियावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पात्र महिलेस ऑनलाइन नारीशक्ती दूत अॅपद्वारे अर्ज करता येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट, २०२४ असल्यामुळे या योजनेस पात्र लाभार्थी महिलांनी योजनेची मुदत संपण्यापूर्वी नारीशक्ती दूत अॅपद्वारे स्वतः अर्ज करावा अथवा महानगरपालिकेने सुरु केलेल्या आपल्या नजीकच्या मदत कक्षांना, अंगणवाडी केंद्रांना व अर्ज भरण्याची सुविधा असलेल्या ठिकाणांना भेट देऊन योजनेचा अर्ज दाखल करावा आणि शासनाने जाहीर केलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Accident : डहाणू येथे रिक्षा व दुचाकी यांचा भीषण अपघात, अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू तर पांच जण गंभीर जखमी

Recent Posts

Related Articles

पनवेल SIB आवासीय क्वार्टर भूमि आवंटन
ताजा खबरेंमुख्य समाचारमुंबई - Mumbai News

पनवेल में SIB आवासीय क्वार्टर निर्माण के लिए 4 हेक्टेयर भूमि का आवंटन

महाराष्ट्र सरकार ने पनवेल, रायगढ़ में 4 हेक्टेयर भूमि SIB के आवासीय...

Share to...