पालघर दि ३१ : (Retirement of Gangadhar Jamnik) शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी उत्तम कार्य करून शासकीय कामकाजाबरोबरच सामाजिक भान ठेवून समाज उपयोगी कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. असे प्रतिपादन कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनी केले .
गंगाधर जामनिक यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातील एक कार्यक्षम अधिकारी सेवानिवृत्त होत आहे, असे प्रतिपादन कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.
पालघर जिल्हा माहिती कार्यालयातील गंगाधर जामनिक हे आज शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभाच्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पालघर जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, सहाय्यक अधीक्षक गंगाराम बांगारा, वरिष्ठ लिपिक राम गोंदके, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी, तासेच जामनिक यांच्या पत्नी सौ. जामनिक, जामनिक यांची मुले कु. प्रहार आणि कु. प्रणव उपस्थीत होते.
यावेळी जामनिक म्हाणाले की, शासकीय सेवेत माहिती व जनसंपर्क खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे माहिती खात्यामध्ये चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न मी केला आहे. माझ्या कार्यकाळात मी माझ्या निष्ठेने शासनाची सेवा केली आहे. सेवानिवृत्त होत असताना मी माझ्या सेवाकाळात लाभलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो, प्रत्येक कार्यात विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिलेले प्रोत्साहन व मार्गदर्शन अनमोल आहे, संपूर्ण शासकिय सेवेमध्ये मला करण्यात आलेल्या मदती बद्दल मी आपला सर्वांचा ऋणी राहील आपण माझ्या पुढील आयुष्यासाठी ज्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.
उपसंचालक डॉ. मुळे हे शुभेच्छा देतांना म्हणाले की, श्री. जमनिक यांनी शासकीय काळात फक्त कार्यालयाच्या कामकाजाचा विचार केला तसेच समाजिक कार्यातही सक्रीय राहिले यापूढील काळातही श्री. जामनिक हे उत्तोमत्तम समाज कार्य करतील असे सांगून पुढील दीर्घआयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपसंपादक प्रविण डोंगरदिवे तसेच उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्री. जामनिक यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
श्री. जमनिक यांनी डहाणू, रत्नागिरी या ठिकाणी काम केले आहे. श्री. जामनिक यांना सेवानिवृत्ती निमित्त कोकण विभागातील सर्वस्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.