Palghar : उत्कृष्ट लघु उद्योगांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे
पालघर : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांना महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. सदर जिल्हा (Palghar) लघु उद्योग पुरस्कार प्राप्त करण्यासाठी अर्ज सादर करावे.
. पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांकास रु.15,000/- व व्दितीय क्रमांकास रु. 10,000/- तसेच पुरस्कार विजेत्यांना मानचिन्ह, शाल व श्रीफळ देवून समारंभपूर्वक गौरविण्यात येते सदर पुरस्कारासाठी लघु उद्योगांची निवड त्यांनी केलेली भांडवली गुंतवणूक, तंत्रज्ञान, स्वावलंबन, उद्योजकता कौटुंबिक पार्श्वभूमी, उत्पादित वस्तु गुणवत्ता, निर्यातक्षमता इत्यादीचा विचार करण्यात येऊन जिल्हास्तराव समितीमार्फत उपरोक्त बाबीकरीता गुण देऊन गुणांकनानुसार प्रथम व द्वितीय पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
अर्जासोबत पुढिल कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत , विहित नमुन्यातील अर्ज,,. लघु उद्योग घटक हा मागील तिन वर्षे पूर्ण झालेला उद्यम नोंदणीकृत असावा, मागील तिन वर्षे उद्योग घटकाचे उत्पादन सुरु असावे, . लघु उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, . यापूर्वी जिल्हा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त घटक जिल्हा पुरस्कार योजनेस पात्र राहणार नाही, . सनदी लेखापाल यांच्याकडील मागील तिन वर्षांचे ताळेबंदपत्रक व नफा तोटा पत्रक सादर करणे आवश्यक आहे.
जिल्हा पुरस्कार योजना 2022 करीता लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उद्योग घटकांनी दि. 25.12.2022 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून परिपूर्ण अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पालघर या कार्यालयात सादर करावेत. याबाबत अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक यांचे कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, पालघर, 103, 1 ला मजला, अ – नविन प्रशासकीय इमारत, कोळगांव, पो. ता. व जि. पालघर (Palghar) उद्योग अधिकारी, दिग्विजय पोळ (मोबाईल क्र. 8655509060) व विकी खिराळे (मोबाईल क्र.- 9022749420), उध्दव माने, (9820062975) इ-मेल आपडी- didic.palghar@gmail.com/ didicpalghar@maharashtra.com येथे संपर्क करावा. असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पालघर यांनी केले आहे.