मराठी न्यूज़

Uttam Kumar Appointment : उत्तम कुमार यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या केरळ प्रकोष्ट च्या प्रदेश संयोजक पदी नियुक्ती!

मुंबई : उत्तम कुमार (Uttam Kumar) यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या केरळ प्रकोष्ट च्या प्रदेश संयोजक पदी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.

  • भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आली नियुक्ती !

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश, केरळ प्रकोष्ट असून त्याच्या संयोजक पदी वसईत राहणाऱ्या उत्तम कुमार (Uttam Kumar) यांची वर्णी लागल्याने महाराष्ट्र नव्हेच तर करेळ राज्यातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रभरातील केरळी समजापर्यंत भाजपाच्या विविध योजना पोहोचणे व पक्षाची राज्यभरात संघटनात्मक नियुक्ती करण्याची त्यांच्याकडे जबाबदारी असून ते लवकरच संपूर्ण महाराष्ट्र भरात दौरा करून प्रत्येक विधानसभा नुसार नियुक्ती करणार आहेत.

उत्तम कुमार (Uttam Kumar) यांचा जन्म मूळचा केरळचा! सहावी पासून ते संघाशी निगडित असून बालस्वयंसेवक म्हणून त्यांनी बालप्रमुख म्हणून त्यांच्याकडे त्यावेळी जबाबदारी होती. त्यांनतर ते 12वी मध्ये वसईत आले यावेळी त्यांनी येथे ही दररोज संघाच्या शाखेत जात असतं! यापूर्वी त्यांनी बूथ प्रमुख पासून ते वसई रोड मंडळ सचिव तसेच मंडळ अध्यक्ष त्यानंतर जिल्हा महासचिव अशी विविध पदांची जबाबदारी त्यांनी पेलली!

2010 पासून त्यांचे वसईत शास्त्रीनगर येथे कार्यालय असून या कार्यालयाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात. प्रतिकूल परिस्थिती उत्तम कुमार (Uttam Kumar) यांना कधी ही कार्यालय बंद करण्याचा विचार आला नाही. विविध समाजउपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून वसईत भाजपा पक्ष उभा करण्याचे त्यांनी प्रत्येक वेळी काम केले. देशभरातून मोठमोठ्या व्यक्तींना वसई आणणे त्यांचे आदरातिथ्य करून त्यांच्या माध्यमातून वसई भाजपा पक्षा कशाप्रकारे बळ देता येईल यावर त्यांचा मुख्य भर असतो.

सनातन धर्म सभा या त्यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते वसईत दरवर्षी हिंदू महासम्मेल भरवतात, 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमास देशभरातून व संत वसई येतात. यंदा होणाऱ्या कार्यक्रमास यापूर्वी आलेल्या प्रज्ञा साध्वी पुन्हा येणार आहेत. त्यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार ऐकण्यासाठी मागच्यावेळी संपूर्ण वसई तालुक्यातून नागरिक आले होते.

उत्तम कुमार (Uttam Kumar) यांनी यावेळी बोलताना, माझ्यावर पक्षाने दाखवलेल्या या जबाबदारील नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करेन. याजबाबदारी बद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मा. देवेंद्र जी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष सन्मा. चंद्रशेखर जी बावनकुळे यांचे आभार व्यक्त करतो. असे यावेळी ते म्हणाले.

Vasai Summit-2023 : छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय नेतृत्व व्हायला हवेत! ; ‘वसई समिट-2023` वैचारिक परिसंवादातील सारांश

Show More

Related Articles

Back to top button