Home महाराष्ट्र पालघर - Palghar News Nitesh Rane At Palghar : हिंदू म्हणून हिंदूंचे सण उत्साहात साजरे करायचे असतील तर महायुतीलाच मतदान करण्याशिवाय पर्याय नाही: आमदार नितेश राणे
पालघर - Palghar Newsमराठी न्यूज़महाराष्ट्रमुंबई - Mumbai Newsवसई-विरार - Vasai-Virar Newsविधानसभा चुनाव 2024

Nitesh Rane At Palghar : हिंदू म्हणून हिंदूंचे सण उत्साहात साजरे करायचे असतील तर महायुतीलाच मतदान करण्याशिवाय पर्याय नाही: आमदार नितेश राणे

Nitesh Rane
  • देश वाचवण्यासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन : Nitesh Rane

  • मोदी यांच्याशी वाया वाया बोलणारा नको तर थेट बोलणारा खासदार हवा- आ. नितेश राणे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा खासदार पालघरमधून दिल्लीला निवडून द्यायचा आहे. वरिष्ठांनी माझ्यावर पालघर लोकसभे अंतर्गत वसई विरार जिल्ह्याच्या सहनिरीक्षकाची जबाबदारी सोपवली आहे.

येथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. ही लोकसभा निवडणूक निर्णय असून मोदी यांच्याशी वाया वाया बोलणारा खासदार नको तर थेट बोलणारा आणि मतदार जनतेच्या समस्या सोडवणारा खासदार निवडून देण्यासाठी मी येथे आलो आहे असे भाजपचे आ. नितेश राणे म्हणाले.

आज शनिवार ११ मे रोजी सकाळी नालासोपारा पूर्वेला रेजेन्सी हॉल येथे भाजपचे आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, राजन नाईक, मनोज पाटील, विश्वास सावंत, मनोज बारोट उपस्थित होते. आ.राणे पुढे म्हणाले, प्रचारादरम्यान येथील कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही हे सुद्धा पाहणार आहे.

पालघरला साधू संतांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेतला जाईल. यावेळी महायुतीचा खासदार निवडून दिला नाही, तर येथील हिंदूंचे काय होईल याचा विचार करावा लागेल. श्रद्धा वालकर सारखी भावी परिस्थिती रोखण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत असे ते म्हणाले. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीकडून भाजपबद्दल विखारी प्रचार सुरू असल्याचे राणे म्हणाले. त्यांना मत म्हणजे आपली सर्व जमीन वक्फ बोर्डला देणे होईल असे म्हणत त्यांना मत म्हणजे लव जिहाद, लँड जिहादला मत देण्यासारखे आहे. ते निवडून आले तर संपूर्ण देशात हिरवे झेंडे दिसतील, हा संदेश आम्ही लोकांपर्यंत घेऊन जात आहोत.

भाजपचे उमेदवार डॉ. सावरा यांना मत म्हणजेच मोदींना मत असे म्हणत ते म्हणाले, मुस्लिम लीग जी भाषा बोलते तेच उद्धव ठाकरे बोलत आहेत. भाजपने येथे डॉ. सावरा यांच्या रूपाने उमेदवार दिला आहे. त्यांनाच आम्ही निवडून दिल्लीला पाठवण्यासाठी जीवाचे रान करू. उद्धव ठाकरे यांचे खाण्याचे वांदे झाले असून त्यांना घर चालवणे कठीण झाल्याचा टोला आ. राणे यांनी लगावला. देश वाचवण्यासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी महायुतीला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. तसेच देशात हिंदू म्हणून हिंदूंचे सण उत्साहात साजरे करायचे असतील तर महायुतीलाच मतदान करण्याशिवाय पर्याय नाही असेही आ. नितेश राणे शेवटी म्हणाले.

Raj Thackeray on Fatwah : राज ठाकरे ने निकाला फतवा.. ‘वोट जिहाद’ के खिलाफ राज ठाकरे आक्रामक

Sanjay Raut : आनंद दिघे असली और मोदी नकली फ़कीर, मुख्यमंत्री ने खुद हड़पी आनंद दिघे की संपत्ति- संजय राउत

Recent Posts

Related Articles

पालघर पत्रकारिता कार्यशाला डिजिटल मीडिया एआई
ताजा खबरेंपालघर - Palghar Newsमुख्य समाचार

पालघर में आधुनिक पत्रकारिता कार्यशाला: जिलाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड़ का आह्वान

पालघर में कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाला का आयोजन हुआ। जिलाधिकारी डॉ....

पालघर पत्रकारिता कार्यशाला डिजिटल मीडिया एआई
ताजा खबरेंपालघर - Palghar Newsमुख्य समाचार

पालघर में आधुनिक पत्रकारिता कार्यशाला का आयोजन, डिजिटल मीडिया और एआई पर फोकस

पालघर में कोंकण संभाग स्तरीय पत्रकारिता कार्यशाला आयोजित की गई। जिला कलेक्टर...

Share to...