मराठी न्यूज़ठाणेपालघरवसई-विरारविधानसभा चुनाव 2024

BJP Says .. महायुतीचा विजय निश्चित झाल्याने आमदार हितेंद्र ठाकूर यांना वैफल्य आणि नैराश्य!

  • पालक मंत्र्यावर आरोप प्रकरणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी माफी मागावी; अन्यथा त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार, BJP Says
  • भाजपचे वसई निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांचा स्पष्ट इशारा
  • वसई विरार मध्ये घर खरेदीसाठी प्रत्येक सामान्य माणसाकडून दोन ते तीन लाख रुपये खंडणी वसूल केली!
    झेड फंड च्या नावाने खंडणीखोरी करणारी जितूभाई नामक व्यक्ती कुणाचा एंजट?
  • फूटमागे 250 रुपये घेऊन अनधिकृत बांधकामाना संरक्षण देणारी दवे नामक व्यक्तीला कुणाचा आशीर्वाद?

वसई : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वसई-नवघर येथील विराट सभेला मिळालेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक आणि एकदिलाने करत असलेले काम पाहून बहुजन विकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांना हतबलता आणि नैराश्य आलेले आहे. त्यातून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बेछूट आणि निराधार आरोप करत आहेत, अशा शब्दांत भाजपचे वसई निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना प्रतिउत्तर दिले. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत; अन्यथा त्यांनी माफी मागावी. नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू, असा स्पष्ट इशारा मनोज पाटील यांनी दिला आहे.

पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येक ठेकेदाराकडून 20 कोटी रुपये जमा करण्यास पालिका अधिकाऱ्यांना सांगितल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भाष्यावर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वैयक्तिक टीका केली होती. त्यांच्या या आरोपांतील निराधारता; किंबहुना आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातूनच शहरात कशापद्धतीने गैरव्यवहार सुरू आहेत, याची माहिती देण्याकरता भाजपच्या वतीने गुरुवार, 16 मे रोजी नालासोपारा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मनोज पाटील यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वर्मावर बोट ठेवत त्यांच्या आरोपांतील फोलपणा दाखवून दिला.

आमदार हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडी हा पक्ष समजत असले तरी ती एक संघटना आहे. त्या संघटनेचा स्वत:चे चिन्ह नाही. या संघटनेचा दोन खाड्यांपुरता आवाका आहे. त्यांच्या या सीमितपणावर उपमुख्यमंत्र्यांनी केलेली टीका ही राजकीय स्वरूपाची होती. पण या टीकेला आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वैयक्तिक टीकतून उत्तर दिले आहे. त्यातून त्यांना आलेली वैफल्यता दिसून येते. पालकमंत्र्यांवरील खंडणीचे आरोप तर हास्यास्पद आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी हे आरोप सिद्ध करावेत, अन्यथा, माफी मागावी. तसे न झाल्यास आमचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मनोज पाटील म्हणाले.

निवडणूक काळात अनेक पक्ष विविध औद्योगिक-सामाजिक संघटना आणि समाजातील घटक आणि व्यावसायिकांना भेटत असतात. त्यांच्यासोबत बैठका घेत असतात. पण आमदार हितेंद्र ठाकूर यांना या बैठका किंवा या संघटनांसोबतचा संवाद दिसला नाही. त्यांना केवळ कंत्राटदारच कसे दिसले? त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचेच कसे दिसले? असा प्रश्न मनोज पाटील यांनी केला. कदाचित वर्षभर आमदार हितेंद्र ठाकूर अशाच पद्धतीने खंडणी वसूल करत असतात. त्यामुळे या बैठकांतून आपल्यासारखीच कुणी तरी खंडणी वसूल करत आहे, अशी पाल त्यांच्या मनात चुकचुकली असावी, त्यातून त्यांनी हा आरोप केला असावा, अशी शंका मनोज पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.

विधानसभा आणि महापालिका निवडणुकांतून बहुजन विकास आघाडी स्वत: दडपशाही आणि दबावाचे राजकारण करत असते. महापालिकेतील कंत्राटदार आणि कर्मचारी यांच्यावर दबाव आणून त्यांना मतदान बुथवर बसण्यास सांगितले जाते. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बहुजन विकास आघाडीस मतदान करण्यास भाग पाडले जाते. अन्यथा; त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. तेव्हा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपवर चिटिंग व दबावाचे आरोप करू नयेत, अशा शब्दांत मनोज पाटील यांनी ठणकावले.

या निवडणुकीत दहशतवादाचा मुद्दा नसतानाही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जाणीवपूर्वक हा मुद्दा उपस्थित केला आहे. पण 1995 साली विधानसभेची निवडणूक दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. या निवडणुका का पुढे ढकलण्यात आल्या? याचा खुलासा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी करावा. दहशतवाद आणि प्रशासकीय यंत्रणांवर दबाव या गोष्टी आमदार स्वत: करत आलेले आहेत. त्या गोष्टी आता त्यांना स्वप्नात दिसत आहेत का? असा प्रश्नही यानिमित्ताने मनोज पाटील यांनी केला.

मागील तीस वर्षे पाणी या मुद्द्यावर बहुजन विकास आघाडीने जनतेला गुंतवून ठेवले. पाणी योजनांसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून विजेच्या प्रश्नावर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी काय केले? याचे उत्तर मागतानाच; 2014 साली भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर तत्कालिन ऊर्जामंत्री श्री चंद्रकांत बावनकुळे आणि ऊर्जामंत्री यांनी तत्कालीन पालकमंत्र्यांसोबत बैठक घेतली. शिवाय एका दैनिकानेही ऊर्जामंत्र्यांच्या नेतृत्वात एक बैठक घेतली. आणि या दोन बैठकांतून विजेसंदर्भातील अनेक प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्यात आल्या, अशी आठवण मनोज पाटील यांनी या प्रसंगी ठाकूर यांना करून दिली.

जितूभाई नामक व्यक्ती कुणाचा एंजट?

वसई तालुक्यात घर घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडून 300 रुपये प्रतिफूट म्हणजेच दीड लाख रुपये खंडणी वसूल केली जात असे. आता राजा उदार झाला असला तरी आता 100 रुपयांची खंडणी वसूल केली जात आहे. हे शंभर रुपये कोण वसूल करते, कुणाच्या माध्यमातून हे पैसे वसूल केले जातात, याचा खुलासाही या वेळी मनोज पाटील यांनी केला. वसई महापालिकेतून बांधकाम परवानगीची फाईल मंजूर करण्यासाठी झेड फंडाच्या नावाखाली खंडणी वसूल केली जाते. या खंडणी वसुलीचे एक स्टिंग ऑपरेशन झालेले आहे.

जितूभाई नामक एक व्यक्ती आणि वसईतील दोन-तीन नामांकित आर्किटेक्टमधील हे संभाषण आहे. या संबंधीचे सगळे पुरावे तपास यंत्रणांकडे आहेत. विशेष म्हणजे या संभाषणात एका महापालिकेच्या अधिकाऱ्याचा वारंवार उल्लेख करण्यात आलेला आहे. यात झेड झेड फंड आणि त्यातील तडजोडी संदर्भातील अनेक खुलासे करण्यात आलेले आहेत. जितूभाई नामक व्यक्ती महापालिकेत कुणाचा एजंट म्हणून वावरते. तो अधिकारी कोण आहे. आणि हे 100 रुपये कुणाला जातात, याचा आर्किटेक्ट खुलासा करतील. या प्रकरणाची लवकरच चौकशी पूर्ण होईल आणि वसईकरांसमोर येईल, अशी खळबळजनक माहिती मनोज पाटील यांनी या वेळी दिली.

दवे नामक व्यक्तीला कुणाचा आशीर्वाद?

अनधिकृत बांधकामांतून होणाऱ्या खंडणी वसुलीचाही मनोज पाटील यांनी या पत्रकार परिषदेत भांडाफोड केला. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी प्रतिचौरस फूट 250 रुपये पालिका अधिकाऱ्यांमार्फत दवे नामक व्यक्तीला द्यावे लागतात. अन्यथा; बांधकाम पाडण्यात येते. या संदर्भातील लेखी तक्रार दोन व्यक्तींनी पोलिसात केलेली आहे. त्याबाबतही लवकरच कारवाई होईल. मात्र ही दवे नामक व्यक्ती कोण आहे? कुणाशी संबंधित आहे? त्याला कुणाचा आशीर्वाद आहे. ही व्यक्ती कुणासोबत बसते? या संदर्भातील कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजही तपासून पाहण्याची आवश्यकता मनोज पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान; राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे या सर्व गंभीर विषयांची चौकशी करण्याची मागणी आम्ही केलेली आहे, अशी माहिती सरतेशेवटी मनोज पाटील यांनी दिली.

वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, तालुका प्रमुख सुदेश चौधरी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते.

Nilesh Sambare VS BJP-NCP : निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी वाडा शहरातील भव्य प्रचार रॅली

Palghar Loksabha Election 2024 : नालासोपारा में BVA की नुक्कड़ सभा

BJP Vs BVA-UBT : डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचा ‘महायुती`ला पाठिंबा!

 

Show More

Related Articles

Back to top button