विधानसभा चुनाव 2024ठाणेमराठी न्यूज़मुंबईवसई-विरार

Nilesh Sambare VS BJP-NCP : निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी वाडा शहरातील भव्य प्रचार रॅली

ठाणे – Nilesh Sambare VS BJP-NCP : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी जिजाऊ संघटनेच्या वतीने वाडा शहरातील विविध भागातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये उमेदवार सांबरे यांच्या आई भावनादेवी सांबरे याही सहभागी झाल्या होत्या.

A grand campaign rally in Wada city for the campaign of Nilesh Sambare

जिजाऊ संघटनेने सांबरे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रातून सात दिवसांची विजय निर्धार यात्रा नुकतीच काढली होती. या विजय निर्धार यात्रेला मतदारसंघातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज वाडा शहरांतूनही निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी जिजाऊ संघटनेने प्रचार रॅली काढत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या शिलाई मशीन या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. रॅलीमध्ये सांबरे यांच्या आई भावनादेवी सांबरे याही सहभागी झाल्या होत्या.

सदर रॅलीची सुरुवात वाडा खंडेश्वरी नाक्यापासून झाली. शिवाजीनगर, शास्त्रीनगर, गणेशनगर, ऐशीत रोड, अशोक भवन, सिद्धार्थनगर, परळी नाका, नेहरूनगर, संजय गांधी नगर, मंगलनगर, पीक कॉलनी, पाटील आळी अशा वाड्यातील सर्व भागातून ही प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीत वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यातही महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

A grand campaign rally in Wada city for the campaign of Nilesh Sambare

प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोषात स्वागत केले. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करीत सांबरे यांना आपला पाठींबा व्यक्त करीत होते. यावेळी जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचारपत्रक वाटत निलेश सांबरे यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण, शेतीसंदर्भात केलेली कामे त्यांना पटवून देत सांबरे यांच्यासारख्या योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले.

CM Yogi Adityanath at Nalasopara : उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १८ मे रोजी नालासोपाऱ्यात!

Show More

Related Articles

Back to top button