विधानसभा चुनाव 2024मराठी न्यूज़वसई-विरार

Palghar Loksabha 2024 : बहुजन विकास आघाडीचा अजेंडा हा विकासाचा – राजेश पाटिल

पालघर 26 एप्रिल (Palghar Loksabha) : बहुजन विकास आघाडीचा अजेंडा हा विकासाचा अजेंडा आहे. गेली 30 वर्ष हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्ही जिल्ह्यात विकासाचा अजेंडा राबवला आहे. असे वक्तव्य पालघर लोकसभा क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर आमदार राजेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

ज्या ज्या ठिकाणी आमची सत्ता आहे त्याच्या ठिकाणी आम्ही विकास केला आहे. जिथे आम्ही नाही तिथेही आम्ही विकासात्मक कामे करण्यावर भर दिला आहे. पालघर लोकसभेचे प्रथम खासदार बळीराम जाधव यांनी डहाणूपर्यंत लोकल सेवा आणण्यासाठी प्रयत्न केले. या अगोदर असा प्रयत्न कोणीच केला नव्हता, वसईतला गॅस गुजरातला जायचा मात्र तो आपल्या लोकांना वापरायला मिळत नव्हता. गुजरातची गॅस पाईपलाईन पालघर जिल्ह्यासाठी आणण्यात आली असून घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहेत.

पालघर लोकसभेचे प्रथम खासदार बळीराम जाधव असताना सॅटॅलाइट सिटी साठी वसई महानगरपालिकेला 300 कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला होता. एक खासदार लोकसभेत जाऊन काय करू शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माजी खासदार बळीराम जाधव आहेत. आमचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक कामावरच माझ्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांचा भर असतो असेही यावेळी पाटील यांनी सांगितले.

पालघर लोकसभेच्या रिंगणात तुम्ही उतरला असा प्रश्न पत्रकारांनी राजेश पाटील यांना केल्यावर मी रिंगणात उतरलो असे सांगता येणार नाही. आज फक्त मी अर्ज दाखल केला आहे तीन तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून यावेळी आमच्या पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्यांचेही अर्ज दाखल करण्यात येतील त्यामुळे मी रिंगणात आहे असे मला वाटत नाही. बहुजन विकास आघाडी व लोकनेते ठाकूर हे रिंगणात आहे. अशी आमची धारणा आहे. असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

BVA Vs Shivsena (UBT) : पालघरमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का ! ५५० कार्यकर्त्यांसह तालुका प्रमुख यांनी केला बविआमध्ये प्रवेश

Show More

Related Articles

Back to top button