Home मराठी न्यूज़ PM Modi’s Birthday Celebrated : …येणाऱ्या दिपावलीनिमित्त भाजपाकडून सफाई कर्मचाऱ्यांना ‌‘पँट पीस व शर्ट पीस‌’ची भेट
मराठी न्यूज़महाराष्ट्रमुंबई - Mumbai Newsवसई-विरार - Vasai-Virar News

PM Modi’s Birthday Celebrated : …येणाऱ्या दिपावलीनिमित्त भाजपाकडून सफाई कर्मचाऱ्यांना ‌‘पँट पीस व शर्ट पीस‌’ची भेट

PM Modi's Birthday Celebrated

PM Modi’s Birthday Celebrated : भाजपा केरळ प्रकोष्ट उत्तम कुमार यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन

वसई : भाजपा केरळ प्रकोष्टप्रतिक्षा फाऊंडेशनच्या माध्यमातून मलबार गोल्डच्या सहकार्याने वसई-विरार महापालिकेच्या शेकडो सफाई कार्मचाऱ्यांना भेट वस्तू वाटप कार्यक्रम भाजपा शास्त्रीनगर कार्यालयासमोर पार पडला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा कार्याचा पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम व महात्मा गांधी जयंतीचे औचित्य तसेच येणारी दिवाळी पाहता भाजपा महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टचे संयोजक उत्तम कुमार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व सफाई कामगारांना ‌‘पँट पीस व शर्ट पीस‌’च्या सेटचे वाटप करण्यात आले.

PM Modi's Birthday Celebrated

कार्यक्रमास प्रमुख अतिथी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, मराठा क्रांती मोर्चा पालघर जिल्हाचे सचिव प्र्रकाश जाधव उपस्थित होते तर, विशेष अतिथी म्हणून भाजपा पदाधिकारी सांतेश मरब, श्रीकुमारी मोहन, एच. आर. सकसेना, निशांत शर्मा, ज्योती सिंग, संजय अचिपालिया, मार्कंडेय पांडे, मनोज चोटालीया आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उत्तम कुमार यांनी यावेळी उपस्थित कामगारांना संबोधित करताना, सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांचे आणि माझे अनेक वर्षांपासून जवळचे नाते आहे. एक रोगराई पासून वसई-विरारला मुक्त ठेवतात तर दुसरे शासनाच्या प्रत्यडेक योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवतात. आज शास्त्रीनगर भाजपा कार्यालयाच्या माध्यमातून लाडकी बहिण योजणेचा वसईमधील हजारांहून अधिक माताभगिणींनी लाभ घेतला आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांचे एक गेट टु गेदर करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. असे यावेळी ते म्हणाले.

कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, माझे आणि कामगारांचे काय संबंध आहे हे वेगळे सांगायला नको, कामगारांच्या समस्या मी दररोज जवळून पाहतो व आमच्या धडक कामगार युनियनच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज उत्तम कुमार यांनी घेतलेला हा कार्यक्रम छोटेखानी असला तरी त्याचा व्होरा मोठा आहे. आज सफाई कामगाराला त्यांच्या माध्यमातून देण्यात येणारी ही भेट वस्तू त्याप्रत्येकाच्या परिवारात एक आनंद आणते. आणि तीच या कार्यक्रमाची मोठी ताकद आहे.

प्रकाश जाधव यांनी बोलताना, वसईत भाजपाला जिंवत ठेवण्यात उत्तम कुमार यांचे खुपमोठे योगदान आहे. उत्तम कुमार यांच्यामाध्यमातून वसई तालुक्यात आजपर्यंत अनेक केंद्रीय मंत्री वसईत आले आहेत, त्यामुळे देशात वसईची ख्याती पोहोचलेली आहे. आजचा कार्यक्रम हा नक्कीच भाजपा तळागाळातील प्र्रत्येकाची दखल घेते याचे मोठे उदाहरण देणारा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले.
सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी यावेळी उत्ततम कुमा यांचे आभार मानले. यापुर्वी त्यांनी वसईतालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंगणवाडीसेविकांना साडी वाटप केले होते.

Mazi Ladki Bahin Yojana : वसई विरार शहर महानगरपालिकेकडे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे ५५ हजार अर्ज

Related Articles

Share to...