मराठी न्यूज़महाराष्ट्रवसई-विरार

Republic Day : वसई विरार शहर महानगरपालिकेत “प्रजासत्ताक दिन” साजरा

विरार : २६ जानेवारी, २०२३ (Republic Day) रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे “प्रजासत्ताक दिन” साजरा करण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयात मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Republic Day

प्रजासत्ताक (Republic Day) दिनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणात मा.आयुक्त महोदयांनी प्रजासत्ताक (Republic Day) दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागांमार्फत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या अनुदानांविषयीची माहिती यावेळी मा.आयुक्त महोदयांनी दिली. मा.आयुक्त महोदय आपल्या भाषणात म्हणाले की, अमृत टप्पा २ अंतर्गत सूर्या योजनेतून महानगरपालिकेला १८५ MLD पाणी उपलब्ध होणार असून केंद्र शासन पुरस्कृत अमृत-२ अंतर्गत मनपा क्षेत्रातील अस्तित्वातील पाणी पुरवठा योजना बळकटीकरणासह नवीन भागात जलवाहिन्या अंथरणे व जलकुंभ बांधणे कामी रु.४९६.८१ कोटी च्या DPR ला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली असून सदर कामी लवकरच निविदा प्रक्रिया सुरु करून कामे हाती घेण्यात येतील.

Republic Day

तसेच शहरातील सांडपाण्याची योग्य प्रकिया करणेसाठी महानगरपालिकेमार्फत नालासोपारा (पूर्व) येथे STP-3 च्या रु.४३१.३२ कोटी च्या DPR ला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली असून सदर कामाची ई-निविदा लवकरच मागविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन स्थितीत सेवा देणे करिता अग्निशमन विभागामार्फत ६४ मिटर उंच शिडीचे टर्न टेबल लॅडर वाहन तसेच ५ नवीन अग्निशमन वाहनेही खरेदी करण्यात येत आहेत.


तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने महानगरपालिकेला १२ नवीन आरोग्यवर्धिनी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यापैकी ४ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्यात आली असून ३ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे कामकाज पूर्ण झाले असून नागरिकांच्या सेवेकरिता लवकरच सुरु करण्यात येतील व उर्वरित ५ आरोग्यवर्धिनी केंद्र लवकरच उभारण्यात येतील. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयात नागरिकांसाठी विविध आरोग्य चाचण्या मोफत केल्या जातात. त्याचप्रमाणे काही महागड्या चाचण्या जसे की MRI, CT Scan इ. महत्वाच्या चाचण्या सर्वसामान्य नागरिकांना मोफत किंवा रास्त दरात उपलब्ध करून देणेसाठी महानगरपालिकेमार्फत स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) ची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे महानगरपालिकेमार्फत शहर सौंदर्यीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे चौक, रस्ते, दुभाजके इ. सौंदर्यीकरणाचे काम, वृक्षारोपणाचे कामही सुरु करण्यात आले आहे. कौल सिटी येथे लवकरच उद्यान विकसित करण्यात येत आहे. तसेच मियावाकी वननिर्मिती ही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेमार्फत पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्यात आला असून सदरील कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील असे मा.आयुक्त यांनी यावेळी सांगितले.

Republic Day

प्रजासत्ताक (Republic Day)  दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने कोरोना काळात नागरिकांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रातील विविध संस्थांचा, नागरिकांचा, तसेच मनपा क्षेत्रातील अवयव दान केलेल्या नागरिकांच्या कुटुबियांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या व पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंचा तसेच महानगरपालिका कर वसुलीच्या कामात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास (Republic Day) आमदार .हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, प्रथम महापौर राजीव पाटील, महानगरपालिकेचे माजी सभापती, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, पत्रकार, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी व मान्यवर नागरिक तसेच महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी व इ.मान्यवर उपस्थित होते.

Vasai Virar Marathon 2022 : गतविजेता मोहित राठोर नव्या विक्रमासह बनला १० व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन २०२२ चा विजेता

Show More

Related Articles

Back to top button