Vasai Summit-2023 : छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय नेतृत्व व्हायला हवेत! ; ‘वसई समिट-2023` वैचारिक परिसंवादातील सारांश
मुंबई : (Vasai Summit-2023) : ‘छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचं नेतृत्व केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय नेतृत्व म्हणून पुढे यायला हवं, समाजात आतंरिक एकात्मता वाढीस लागण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्या संस्कृतीवरील आक्रमणं थांबली पाहिजेत,` अशी अपेक्षा शिवशंभू विचारमंचचे महाराष्ट्र क्षेत्र संघटक सुधीर थोरात यांनी व्यक्त केली.
नरवीर चिमाजी आप्पा यांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधून वसई-मधुबन टाउनशिप येथे रविवार, 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळात ‘वसई समिट-2023` (Vasai Summit-2023) या वैचारिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
समीटच्या पहिल्या सत्रात ‘शिवकालीन इतिहास आणि जेंझ` या विषयावर परिसंवाद झाला. या सत्रात शिवशंभू विचार मंचचे महाराष्ट्र क्षेत्र संघटक सुधीर थोरात व शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक तथा लेखक डॉ. केदार फाळके सहभागी झाले होते. प्रसिद्ध समीक्षक आणि डीजी-9चे संस्थापक-संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी आपल्या खुमासदार शैलीत या द्वयींना इतिहासाची पाने उलगडायला लावली.
शिवपूर्व काळापासून आतापर्यंतच्या परकीय आक्रमणांवर सुधीर थोरात यांनी प्रकाश टाकत; छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्यकर्तृत्व उपस्थित प्रेक्षक-श्रोत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आताच्या ‘लँड जिहाद` व ‘लव्ह जिहाद`च्या माध्यमातून हिंदूंवर होत असलेल्या नवनव्या आक्रमणांबाबतही या परिसंवादात त्यांनी काळजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते, अशी कथा सांगितली जाते. मात्र हे ‘नेरेटिव्ह` कसे चूक आहे, यासाठी छत्रपती महाराजांनी गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराच्या पुनर्निमाणाची कथा सांगितली. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर असते तर त्यांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मात कशाला घेतले असते? असा प्रश्न विचारत सुधीर थोरात यांनी हे नेरेटिव्ह कसे खोटे आहे, हे स्पष्ट केले.
शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक तथा लेखक डॉ. केदार फाळके यांनी या परिसंवादातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातला ‘कुशल प्रशासक` समोर आणला. राज्याभिषेक झालेले छपत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होत. छपत्रती शिवाजी महाराज यांच्यातला राज्यकर्ता जितका कर्तृत्ववान होता, तितकाच त्यांच्यातला ‘कुशल प्रशासक`ही कर्तबगार होता, याची उदाहरणे फाळके यांनी सांगितली. शहाजीराजे यांच्याकडे जहागिरी होती, मात्र शिवाजी महाराज राजे होताच त्यांनी जहागिरी ठेवली नाही. त्याऐवजी वतने बहाल केली. ही वतने बहाल करताना त्यांनी सामान्य जनतेकडून घेण्यात येणार कर; आणि तो भरण्यासाठी नियमावली तयार केली.
यातून त्यांचा दूरदृष्टीपणा दिसतो, असे सांगत फाळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आपली आंतरिक शक्ती व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज हे क्रांतिकारकांचे मुख्य प्रेरणास्रोत होते. विशेष म्हणजे शेकडो वर्षांच्या आक्रमणांनंतर आपल्या भाषेवर झालेले परिणाम दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी भाषाशुद्धीकरता विशेष प्रयत्न केल्याचे सांगितले. परंतु या राजकीय विजयाचे आपल्याला सांस्कृतिक विजयात रूपांतर करता आले नाही, अशी खंत सरतेशेवटी या दोन्ही वक्त्यांनी व्यक्त केली.
‘स्थळ, काळ आणि स्थित्यंतरां`चे समाजाला आकलन करून देता यावे, या प्रमुख उद्देशातून या “वसई समिट 2023` या वैचारिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
राक्षसी वृत्तीला नायक बनवले गेले तर रामलीला कशी सादर होणार? – भाऊ तोरसेकर
‘वसई समिट 2023` (Vasai Summit-2023) या वैचारिक परिसंवादाचे दुसरे सत्र ‘ईरा ऑफ मॅन्युपुलेटेड मेडियम्स` या विषयावर झाले. या परिसंवादात ‘द केरला स्टोरीचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन व वरिष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध राजकीय समीक्षक भाऊ तोरसेकर सहभागी झाले होते. ‘मुडस ऑफ भारत या इंस्टाग्राम आणि यूट्यूबर्स आदिती दधीच यांनी या द्वयींची मुलाखत घेतली. या परिसंवादात या द्वयींनी भारतातील राजकीय, सांस्कृतिक व कलाक्षेत्र कशा पद्धतीने ‘मॅन्युप्युलेट` केले जात आहे, याबाबत सविस्तर विवेचन केले.
दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी; ‘द केरला स्टोरी` निर्मितीच्या आधी त्यांना आलेले अनुभव आणि निर्मितीनंतर त्यांना न्यायालयीन लढाईचा कसा सामना करावा लागला, दरम्यानच्या काळात माध्यमांपेक्षा सोशल मीडियावरून त्यांना कशा पद्धतीने ‘मॅन्युप्युलेट` करण्याचा प्रयत्न झाला, याची कहाणी सांगितली. विशेष म्हणजे 10-15 वर्षांपूर्वी अचानक मिस युनिव्हर्स-मिस वर्ल्ड होण्याचे प्रमाण भारतातून वाढले होते. त्यामागे कंपन्यंनी सौंदर्य स्पर्धांच्या माध्यमातून भारतीय जनतेला कसे मॅन्युप्युलेट केले, त्याही आधी पाश्चिमात्त्य सिनेसृष्टीतून ‘भारतीय सिनेमां`चे ‘बॉलीवूड`करण कसे केले गेले? याची मनोरंजनात्मक कथा सुदीप्तो यांनी या परिसंवादात सांगण्याचा प्रयत्न केला. (Vasai Summit-2023)
दरम्यान; वरिष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध राजकीय समीक्षक भाऊ तोरसेकर यांनी हा ‘मॅन्युप्युलेटेड मिडीयम्स` नव्हे; तर ‘मॅन्युप्युलेटेड माइंड`चा गेम असल्याचे अनेक उदाहरणांतून व सोप्या भाषेत सांगून उपस्थित प्रेक्षक-श्रोत्यांकडून टाळ्या मिळवल्या. 1990 च्या दशकात आलेल्या अनेक चित्रपटांतून समाजमन ‘मॅन्युप्युलेट` करण्याचा प्रयत्न केला गेला. ‘बाजीगर`, ‘अंजाम`, ‘डर`सारख्या चित्रपटांतून राक्षसी वृत्तीचे उदात्तीकरण केले गेले. त्यामुळे एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले जाते, तेव्हा समाजाला काही वाटेनासे होते. प्रसारमाध्यमांसाठीही ती बातमी राहत नाही. त्याविरोधात आवाज उठत नाही. अशा राक्षसी वृत्तीला नायक बनवले गेले तर रामलीला कशी सादर होणार? असा प्रश्न करत भाऊ तोरसेकर यांनी उपस्थित प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडले. (Vasai Summit-2023)
माध्यमेही आजकाल आहे, ती बातमी दाखवत नाहीत. त्यामुळे वेगळीच काही तरी न्यूज होत राहते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमित्ताने आता हे सगळे बदलत आहे. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना त्यांना हव्या असलेल्या पद्धतीनेच ‘मॅन्युप्युलेट` करत असल्याचे सांगत भाऊ तोरसेकर यांनी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नेतृत्वगुण अधोरेखित केले. (Vasai Summit-2023)
Vasai Virar : ‘सूर्या पाणी योजना` तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देण!