भाजप वसई (Vasai Virar ) विधानसभा प्रमुख मनोज पाटील आणले सत्य समोर
प्रतिनिधी
विरार : सूर्या पाणीपुरवठा टप्पा-1 ही योजना महाराष्ट्र राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वसई-विरारकरांसाठीची देण आहे. एल अँड टी या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून 2017 पासून सुरू झालेली ही योजना पुढील तीन वर्षांत पूर्णत्वास येणे अपेक्षित होते, परंतु काही अपरिहार्य कारणे व त्यानंतर आलेला कोविड संक्रमण काळ यामुळे ही योजना लांबली होती. परंतु आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, अशी माहिती देत वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील यांनी स्थानिक राजकीय पक्षांच्या श्रेयवादातील हवा काढली आहे.
वसई-विरार शहराला सूर्या पाणी प्रकल्प योजनेतून अतिरिक्त पाणी देण्यास सुरुवात झाली आहे. उद्घटानामुळे लांबलेले पाणी अखेर आंदोलनांमुळे उद्घाटन न करता देण्यात येत आहे. वसई-विरारकरांना पाणी मिळू लागल्याने या कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांत चढाओढ लागली आहे. मात्र वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील यांनी या योजनेतील सत्यता वसई-विरारकरांसमोर आणली आहे.
सूर्या पाणी प्रकल्प योजना ही महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रथमच सुरू करण्यात आलेली योजना आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली या योजनेची संकल्पना आखली होती. 403 एमएलडीच्या या योजनेतून वसई-विरारकरता 185 एमएलडी पाणी मिळणार आहे. तर उर्वरित 218 एमएलडी पाणी हे मिरा-भाईंदर महापालिकेला प्राप्त होणार आहे. मौखिक सूचनेवर एमएमआरडीएने वसई-विरार महापालिकेला आता 40 एमएलडी इतके पाणी सोडलेले आहे. या पाण्याच्या अनुषंगाने वसई-विरार महापालिका अंतर्गत जलवाहिन्या, जलकुंभ आणि पाणी दाब चाचणी घेत आहे. या चाचणी सुरळीत पार पडल्यानंतर वसई-विरार शहराला सुरुवातीला 80 एमएलडी इतके पाणी प्राप्त होईल. तर उर्वरित 105 एमएलडी पाणी पुढील काही महिन्यांत मिळण्याची अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
वसई-विरार महापालिकेला प्राप्त होणाऱ्या 185 एमएलडी पाण्यापैकी 15 एमएलडी पाणी ग्रामीण परिसराला; तर उर्वरित पाण्यातून शहराची अतिरिक्त तहान भागवली जाणार आहे, अशी अधिकची माहितीही मनोज पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, अशा मुद्द्यांवर राजकारण होतच असते. वसई-विरारकरता पाणी हा भावनिक मुद्दा आहे. त्यामुळे राजकारण होणे अपेक्षितच होते. स्थानिक राजकारण्यांनी मागील 30 वर्षे पाण्यावर राजकारण करत निवडणुका जिंकलेल्या आहेत. पंतप्रधानांनी या योजनेचे उद्घाटन करावे, अशी अपेक्षा सामान्य जनतेची असणे साहजिकच आहे. परंतु पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून आलेल्या होत्या, असे सांगत मनोज पाटील यांनी या वादावर पडदा टाकला आहे. हा विषय महाराष्ट्र राज्य व एमएमआरडीएचा आहे. असे असले तरी ही योजना भाजप व त्यांच्या महायुती सरकारने पूर्ण केली असल्याचे ठाम मत मनोज पाटील यांनी सरतेशेवटी व्यक्त केले आहे.
Fake Doctor : मुंबई में फर्जी डॉक्टर गिरफ्तार,पिछले 5 सालों से चला रहा था क्लीनिक
#ManojPatil #MetroCitySamachar