वसई-विरारमराठी न्यूज़
Power Cut ! वसई मधील लोडशेडिंग तात्पुरते. 21 एप्रिल नंतर वीजपुरवठा पूर्ववत होईल
- भाजपा च्या शिष्टमंडळास अधीक्षक अभियंता संजय खंदारे यांची माहिती
वसई तालुक्यात गेले काही दिवस अघोषित लोडशेडिंग (Power Cut) सुरू असून कोणत्याही वेळी वीज जाण्याने नागरिक हैराण आहेत, त्यातच वाढलेली उष्णता, यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन, भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांच्या सोबत प्रमुख पदाधिकारी नंदकुमार महाजन, कपिल म्हात्रे, बाळा सावंत, शेमल आजागिया यांनी महावितरणचे वसई मंडळ अधीक्षक अभियंता संजय खंदारे यांची भेट घेतली.
त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेत तारापुर बोईसर येथे सुरू असलेल्या महापारेषण च्या कामामुळे वसई ला येणार्या दोन वाहिन्या पैकी एक वाहिनी बंद असल्याने वीज पुरवठा कमी झाला असून 21 एप्रिल पर्यंत काम पूर्ण होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल व सुरू असलेले भारनियमन बंद होईल असे आश्वासन दिले.