Home महाराष्ट्र पालघर - Palghar News Vadhavan Port : वाढवणला आधीही विरोध होता आजही आहे व पुढेही राहील- हितेंद्र ठाकूर
पालघर - Palghar Newsवसई-विरार - Vasai-Virar Newsविधानसभा चुनाव 2024

Vadhavan Port : वाढवणला आधीही विरोध होता आजही आहे व पुढेही राहील- हितेंद्र ठाकूर

Vadhavan Port

पालघर : वाढवण बंदर (Vadhavan Port) हा झाई पासून थेट उत्तन पर्यंतच्या आपल्या मच्छीमारांच्या पोटावर पाय आणणारा प्रकल्प आहे. वाढवण बंदरा संदर्भात ज्यावेळी पालकमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी जेएनपीटीचे एमडी सेठी म्हणून आले होते. त्यावेळी त्या बैठकीत खासदार होते विधानसभेचे व विधान परिषदेचे आमदार असताना सुद्धा त्यावेळी एकमेव पक्ष होता ज्याने वाढवण बंदर नको म्हणून त्यावेळी त्या बैठकीत सांगितले होते.

Vadhavan Port

त्यावेळी निवडणूक घोषित सुद्धा झाली नव्हती त्यावेळी वाढवणला विरोध करणारा बहुजन विकास आघाडी हा एकमेव पक्ष होता. हा विरोध आधी ही होता आजही आहे व पुढेही राहील असे वक्तव्य बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारांशी पालघर येथे बोलताना केले.

बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभेचे उमेदवार राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर पालघर येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकाराशी बोलत होते. उमेदवारीचा अर्ज राजेश पाटील यांनी पहिल्याच दिवशी भरला होता. दुसरा अर्ज असावा काही अर्जात चूक झाली तर त्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आज अर्ज भरत आहोत. आजची रॅली ही विजयावर शिक्कामोर्तब करणारी रॅली आहे. असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

गावितांचे तिकीट कापण्यात आले. या विषयावर ठाकूर यांना छेडले असता त्यांनी गावितांचे तिकीट कापण्यास राजेश पाटील कारणीभूत आहेत. कारण काही लोकांचे सर्वे वारंवार चालू असतात त्यात राजेश पाटील यांच्यासमोर कोणाचा टिकाव लागणार नाही. हे माहिती झाल्यामुळे त्यांचे तिकीट कट झाले त्यांचे कर्तृत्व तुम्हाला माहित आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही असा टोलाही ठाकूर यांनी गावीताना लगावला.

Vadhavan Port

जिल्ह्याचे पहिले खासदार बळीराम जाधव यांनी उपनगरीय लोकल सेवेला हिरवा झेंडा दाखवला. पालघरच्या समोर असलेल्या बॉम्बे हाय येथून आपल्याला गॅस मिळावा हा आग्रह धरला. आज अर्ध्या जिल्ह्यात पाईप द्वारे गॅस पोहचला आहे. उर्वरित जिल्ह्यात लवकरच गॅस येणार आहे. त्याच बरोबरीने औद्योगिक क्षेत्रात गॅस कसा मिळेल जेणेकरून कारखान्यांची संख्या आपल्याकडे वाढेल व त्यामुळे रोजगार निर्माण होतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. बळीराम जाधव यांच्या कारकीर्दीत डहाणू नाशिक रेल्वेचा सर्वे झाला होता. त्यानंतर त्याबाबत कोणीही लक्ष दिले नाही त्या कामाला गती देण्याचे काम ही आम्ही करणार आहोत. असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

Palghar Loksabha 2024 : बहुजन विकास आघाडीचा अजेंडा हा विकासाचा – राजेश पाटिल

Recent Posts

Related Articles

Share to...