मराठी न्यूज़

Vasai Virar Municipal Corporation : AMC सुखदेव दरवेशी आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित

पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

वसई विरार महानगर पालिके (Vasai Virar Municipal Corporation) चे सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांना नवभारत नवराष्ट्र समुहाच्या सन्मान सोहळ्यात “आदर्श प्रशासकीय अधिकारी ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पालघर येथील लायन्स क्लब सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला.

सुखदेव दरवेशी हे राज्यात प्लास्टिक किलर म्हणून प्रसिद्ध आहेत. राज्यातील इतर महानगरपालिकेच्या तुलनेत त्यांनी सर्वाधिक प्रतिबंधित प्लास्टिक साठ्यावर कारवाई केली आहे..आतापर्यंत त्यांनी हजारो किलो प्लास्टिक जप्त केले आहे. व लाखो रुपये दंडात्मक वसुली केली आहे .1992 पासून नाकासोपारा नगर परिषद ते वसई विरार महानगर पालिकेच्या स्थापनेनंतर आजतगायत ते 32 वर्ष प्रशासकीयं सेवेत कार्यरत आहेत.

आरोग्य निरीक्षक ते सहाय्यक आयुक्त पदा पर्यंतचा कारभार पाहणारे दरवेशी यांनी आपल्या प्रशासकीय कार्यकाळात घन कचरा व्यवस्थापन, जनगणना, पर्यावरण, उद्यान व वने , वृक्षप्राधिकरण , शिक्षण , आरोग्य, स्वछता, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, शेती अशा विविध विभागाचे प्रमुख म्हणून ते पालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. प्रशासकीय सेवेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत नवराष्ट्र समूहाच्या सन्मान सोहळ्यात त्यांना आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्काराने जिल्हाधिकाऱ्यांनी सन्मानित केले.

त्यांचे सेवाकाळात त्यांनी सार्वजनिक स्वच्छता उपद्रव नियंत्रण , तंबाखु तंबाखुजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक , सेवन प्रतिबंध ह्यासाठी क्लीनअप मार्शल्स संकल्पना राबवून मनपास कोटयवधी रुपयांचा महसुल जमा करून दिला व शहर स्वच्छ , हरित , नीटनेटके ठेवणेसाठी उपक्रम कार्यान्वित केला तसेच शासनाने मनपास वार्षिक २५००० वृक्ष लागवडीचे दिलेले २५ वर्षांचे उद्दिष्ट त्यांनी २ वर्षात केले होते . त्याचबरोबर सन २०१५/१६ मध्ये थीमॅटिक ड्राईव्हस राबवून संबंध देशात मनपास प्रथम क्रमांक मिळवून देणेस सहायक आयुक्त म्हणून विशेष योगदान दिले होते अशा विशेष कामगिरीचा सुद्धा दखल घेतली आहे

सुखदेव दरवेशी आदर्श प्रशासनिक अधिकारी पुरस्कार से सम्मानित

 

Show More

Related Articles

Back to top button