वसई (Vasai) : उधोजक मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीवजी पाटील ह्यांच्या शुभ हस्ते व त्यांच्या सौजन्याने तुंगारेश्वर ब्रिज लगत वाहतुक पोलीस केबिन चौकीचे शनिवार दि:-03/08/2024 रोजी लोकार्पण करण्यात आले.
बहुतांशी ठिकाणी वाहतूक पोलिसांना ट्राफिक नियंत्रण करण्याकामी उभे राहण्यासाठी जागा नसल्या कारणाने उन्हाळ्यात व पावसाळ्यात काम करणे जिकरीचे होते हा उद्देश ठेवुन केबिन चौकीचे लोकार्पण करण्यात आले.
आशा प्रकारच्या केबिन चौकी घोडबंदर ते मनोर महामार्गावर गरज असलेल्या ठिकाणी उधोजक मित्र संस्थे कडुन देऊ असा मानस राजीवजी पाटील ह्यांनी व्यक्त केला.ह्या शुभ प्रसंगी वालीव पोलीस स्टेशन वरिष्ठ पो. निरीक्षक जयराम रानावरे साहेब, वाहतूक वरिष्ठ पो. निरीक्षक महेश शेट्टे व मा. नगरसेवक सुनील आचोळकर उपस्थित होते. ह्या केबिन चौकीची संकल्पनेस पत्रकार मित्र नरेश बंटवाल व सुनील मो.आचोळकर ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ट्रॅफिक हवालदार राठोड ह्यांच्या सततच्या पाठपुराव्या मुळे ही चौकी निर्माण झाली. स्थानिक कार्यकर्ते सचीन वैद्य,राजेश भगते, अर्जुन सुतार, दीपक जाधव, अरुण भिमरा, विजय गुप्ता, रुपेश जाधव, प्रवीण भिमरा, कमलाकर पारधी, वैभव भोईर, गोपीनाथ गोरडे, मैमूला, नाना पगारे ह्यांनी हा चांगला उपक्रम राबवल्याबद्दल नानांचे आभार मानले.