- वसई आणि परिसरात रविवारी शिट्टीचा आवाज घुमला (Bengali Foundation’s support to Bavia!)
- बविआ उमेदवार राजेश पाटील यांचा आता शहरी भागातील नागरिकांशी संवाद
विरार : बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश पाटील यांनी रविवार, 13 मेपासून वसई आणि परिसरात आपल्या प्रचाराला सुरुवात केली. या प्रचारदौऱ्यात त्यांनी वसई पश्चिम पट्टीतील नागरिकांशी संवाद साधला. अनेक समाज व त्यांच्या संघटना प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवला आहे. विरार येथील बेंगाली फाउंडेशननेदेखील राजेश पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याचे पत्र फाउंडेशनने 12 मे रोजी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना सुपूर्द केले आहे.
पालघर, बोईसर व विक्रमगड आणि परिसरातील ग्रामीण भागात प्रचार मोहीम राबविल्यानंतर बहुजन विकास आघाडीने वसई, विरार आणि नालासोपारा या शहरी भागात आपला मोर्चा वळवला आहे. या भागात बहुजन विकास आघाडीची पक्ष बांधणी मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी असलेल्या हक्काच्या मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी राजेश पाटील आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज रविवारचा मुहूर्त साधला. विशेषत: पश्चिम पट्टीत प्रचार करण्यावर बहुजन विकास आघाडीचा भर राहिला. या प्रचार मोहिमेत माजी महापौर नारायण मानकर, माजी नगरसेवक कन्हय्या भोईर व अन्य आजी-माजी पदाधिकारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे खुद्द आमदार हितेंद्र ठाकूर हेदेखील आता राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत.
Amit Shah Vasai : यु.सी.सी , सी.ए.ए देशाला आवश्यक- अमित शाह