वसई, BJP Vs BVA : वसईतील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी युवा विकास आघाडी अजित भोईर यांच्या नेत्रत्वखाली आमदार हितेंद्र ठाकूर , आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेत थेट बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे त्यामुळे निवडणुकीच्या काळात बविआची ताकद वाढली आहे.
अजित भोईर , माजी नगरसेविका विजया भोईर यांच्यासह बविआ कार्यकर्ते उपस्थित होते आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना नागरिकांच्या समस्या असतील तर कधीही या तुमच्यासाठी दार उघडे आहे असे सांगितले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, उद्योग आधारी राज्य समन्वयक, सोशल मीडिया आणि आयटी सेक (UBM) संजय कश्यप ,माजी जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया आणि आयटी सेक राज्य समन्वयक आयटी एसईसी (यूबीएम) राज सिंह, प्रदीप यादव माजी जिल्हाध्यक्ष अ उद्योग आघाडी माजी जिल्हाध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा जिला उपाध्यक्ष वसई-विरार, पंकज बारई राज्य समन्वयक सोशल मीडिया (OBM), वीरेंद्र विश्वकर्मा (कार्यकारी), बिरजू राठोड (कार्यकर्ता), मनीष शर्मा (कामगार) , धर्मेंद्र यादव (जिल्हा उपाध्यक्ष ओबीएम), राजेश यादव, मिथिलेश मिश्रा,वाशिम अन्सारी ,सुरेश यादव,, सुनिक गौतम यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला.
हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांनी नेहमीच उत्तर भारतीयांच्या समस्या जाणून घेतल्या आहे. त्यांच्या कामाने प्रेरित झालो नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व चांगल्या सुविधा जनतेला मिळाव्या म्हणून बविआसोबत नेहमी राहणार असे यावेळी प्रदीप यादव व कार्यकर्त्यांनी सांगितले.